संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट बछड्याचे आईसोबत यशस्वी पुनर्मिलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 08:36 PM2022-10-12T20:36:46+5:302022-10-12T20:37:18+5:30
बछडयाचे त्याच्या आईसोबत पुनर्मिलनासाठी नियोजन करण्यात आले.
मुंबई- १० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या कर्मचाऱ्यांना एक बिबट बछडा या परिसरात आढळून आला. त्यांनी त्यास संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कर्मचान्यांकडे हस्तातरीत केले. पुढे त्याला तात्काळ राष्ट्रीय उद्यानाच्या वन्यजीव रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे आणि वन परिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले.
बछडयाचे त्याच्या आईसोबत पुनर्मिलनासाठी नियोजन करण्यात आले. यावेळी उद्यानाचे वन परिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे आणि ल्याच्या अधिनस्त बचाव पथकातील सदस्य वैभव पाटील, संदीप गायकवाड, दिनेश गुप्ता, राजेश मेघवले, प्रशांत टोकरे, अजय चुने डॉ. शैलेश पेठे आणि डॉ. जसना नांबियार यांनी श्रीमती रेवती कुलकणी, उप संचालक (दक्षिण) आणि श्री. संजय कांबळे, सहायक वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनाखाली तसेच वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन आरे, वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य यांनी सदर पुनर्मिलनासाठी नियोजनबध्द प्रयत्न केले. त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता त्याच्या आईबरोबर पुनर्मिलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी बिबट मादी बछडयाच्या जवळपास फिरताना आढळून आली तथापि बछडा ठेवलेल्या
पिंजऱ्याजवळ जाणे तिने टाळले.
११ ऑक्टोबर रोजी वरील पथकामार्फत पुन्हा बछड्याचे आईसोबत पुनर्मिलनाकरीता प्रयत्न करण्यात आला. बिबट बछडयाला पिंजऱ्यामध्ये ठेवून त्याच्या सर्व हालचाली निरिक्षण करण्याकरिता सभोवती कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. याकामी पूर्व अनुभव असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे वनविभागातील मुंबई वनपरिक्षेत्र कर्मचारी यांचेकडून सुरक्षित अंतरावरून कॅमेराच्या सहाय्याने बिबट बछाड्यावर नजर ठेवण्यात आली.
१२ ऑक्टोबर पहाटे ३.४५ च्या दरम्यान बछड्याची आई पिजऱ्याच्या ठिकाणी आली. पथकामार्फत बछड्याची आई आलेली पाहताच पिंजऱ्याचे दार दोरीच्या साहाय्याने सुरक्षित अंतरावरुन उघडण्यात आले. पिंजयातून बछडा बाहेर येताच त्याच्या आईने त्यास जवळ घेऊन कुरवाळून क्षणा लगतच्या झाडोऱ्यात बछड्यासह निघून गेली. या मोहिमेत कॅमेरा ट्रॅप मधील प्राप्त चित्रांच्या आधारे आणि रादर मादी बिबटच्या शरीरावरील ठिपवयांची ठेवण तपसता ती आरे दुग्ध वसाहत येथील C-३३ असल्याचे तसेच गतवर्षी रेडिओ कॉलर लावून तिला वनक्षेत्रात मुक्त करण्यात आल्याचे आढळून आले होते. आणि त्याच बिछड गादीचा बछडा असल्याचे निष्पन्न झाले, बछड्याचे त्याच्या आई बरोबर यशस्वी पुनर्मिलन झाल्याने वनविभागाच्या तसेच सर्व सहभागी बचाव पथकातील सदस्यानी समाधान व्यक्त केले.