आयआयटी बॉम्बेच्या संकुलात आता बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 04:20 AM2019-08-15T04:20:20+5:302019-08-15T04:20:41+5:30

आयआयटी बॉम्बेच्या परिसरात बिबट्याचे दर्शन सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

leopard in IIT Bombay complexes | आयआयटी बॉम्बेच्या संकुलात आता बिबट्या

आयआयटी बॉम्बेच्या संकुलात आता बिबट्या

Next

मुंबई : आयआयटी बॉम्बेच्या परिसरात बिबट्याचे दर्शन सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आधी वर्गात लेक्चर सुरु असताना शिरलेली गाय, नंतर मोकाट बैलाचा विद्यार्थ्यावर हल्ला आणि आता बिबट्याचा संचारयामुळे आयआयटी संकुलातील विद्यार्थी कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

आयआयटी संकुलाचं डोंगराळ भागात बिबट्याच्या वावराचा व्हिडीओ विद्यार्थ्यंमध्ये व्हायरल होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली असल्याच्या प्रतिक्रियाही ते देत आहेत. आयआयटी प्रशासनाच्या माहितीनुसार हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून येथे वन्य प्राण्यांचा संचार पाहायला मिळतो. मात्र यावर आपण लवकरच सुरक्षिततेसाठी खबरदारीच्या उपाययोजना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आयआयटीचा भाग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारीत येत असल्याने तेथे वन्य प्राण्यांचा वावर असण्याची शक्यता पश्चिम विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी बोलून दाखविली. हा विभाग प्राण्यांचा अधिवास आहे़ विद्यार्थी किंवा तेथील स्थनिकांनी त्यांना या दरम्यान कोणताही अडथळा आणू नये किंवा इजा करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन केले. यामुळे वन्यजीव आणि आपण दोघेही सुरक्षित राहू असा सल्ला त्यांनी दिला. तरीही मोकाट गुराढोरानंतर बिबट्या आणखी आत शिरला तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Web Title: leopard in IIT Bombay complexes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.