भरकटलेल्या बिबट्या मादीला जंगलात सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:08 AM2017-12-13T02:08:02+5:302017-12-13T02:08:17+5:30
नुकतेच अंधेरी येथील शेर-ए-पंजाबमधील नर्सरी शाळेमध्ये बिबट्या घुसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर, पोलीस यंत्रणा, वनविभागाचे अधिकारी, अग्निशमन दल आणि प्राणिमित्र घटनास्थळी दाखल झाले.
मुंबई : नुकतेच अंधेरी येथील शेर-ए-पंजाबमधील नर्सरी शाळेमध्ये बिबट्या घुसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर, पोलीस यंत्रणा, वनविभागाचे अधिकारी, अग्निशमन दल आणि प्राणिमित्र घटनास्थळी दाखल झाले. वनअधिका-यांनी बिबट्या मादीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर तिला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. ही मादी अवघ्या एक वर्षांची आहे.
बिबट्या मादीला सोमवारी रात्री १० वाजता सोडून देण्यात आले आहे. डॉक्टरच्या सर्टिफिकेटची आम्ही वाट पाहत होतो. सोमवारी संध्याकाळी डॉक्टरचे सर्टिफिकेट मिळाले. त्याच रात्री तिला जंगलात सोडून देण्यात आले आहे.
प्राण्यांना सोडण्याचा निर्णय हा त्या प्राण्याच्या वर्तणुकीवर आणि कोणत्या परिस्थितीत पकडले आहे, त्यावर अवलंबून असतो. आरे कॉलनीत पकडलेल्या बिबट्याने पाच हल्ले केले होते. त्यात दोन लहान मुलांचा जीव घेतला होता. त्यामुळे या बिबट्याचे वर्तन बदलले होते. जर बिबट्याला सोडले असते, तर लोकांचा जीव धोक्यात आला असता. त्यामुळे त्या बिबट्याला सोडलेले नाही. तो अजूनही पिंजºयात आहे. मात्र, अंधेरीमध्ये मादी पकडण्यात आलेल्या बिबट्या मादीचे वय एक ते सव्वा वर्षे आहे. ती रस्ता भरकटली होती. कोणाला जखमी करण्यासाठी आली नव्हती. तिची वर्तणूक चांगली होती. त्यामुळे तिची शारीरिक हालचाल स्थिर झाल्यावर मादीला सोडण्यात आले, अशी माहिती ठाणे वनविभागाचे उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.