मुंबईत लेप्टोचे तीन बळी; गॅस्ट्रोचे ७७९ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:43 AM2018-07-01T01:43:45+5:302018-07-01T01:43:56+5:30

शहर-उपनगरात पावसाची जोर‘धार’ सुरू झाली, तशी साथीच्या रोगांनीही डोके वर काढायला सुरुवात केली आहे. परिणामी, बदलत्या ऋतुमानामुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले असून, जूनच्या अवघ्या एका महिनाभरात आतापर्यंत लेप्टोचे ५ रुग्ण आढळले असून, तीन बळी गेले आहेत, तर गॅस्ट्रोचे तब्बल ७७९ रुग्ण आढळले आहेत.

Lepto has three victims in Mumbai; Gastro's 779 patients | मुंबईत लेप्टोचे तीन बळी; गॅस्ट्रोचे ७७९ रुग्ण

मुंबईत लेप्टोचे तीन बळी; गॅस्ट्रोचे ७७९ रुग्ण

Next

मुंबई : शहर-उपनगरात पावसाची जोर‘धार’ सुरू झाली, तशी साथीच्या रोगांनीही डोके वर काढायला सुरुवात केली आहे. परिणामी, बदलत्या ऋतुमानामुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले असून, जूनच्या अवघ्या एका महिनाभरात आतापर्यंत लेप्टोचे ५ रुग्ण आढळले असून, तीन बळी गेले आहेत, तर गॅस्ट्रोचे तब्बल ७७९ रुग्ण आढळले आहेत.
साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत चालले असून, १ ते ३० जून या कालावधीत मलेरियाचे ३५६, डेंग्यूचे २१, लेप्टोचे पाच, गॅस्ट्रोचे ७७९, तर काविळीचे ९४ रुग्ण आढळले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या काहीशी कमी असली, तरी या आजारांच्या रुग्णांमध्ये तेवढ्याच प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यंदा जून महिन्यात कॉलराचा एकही रुग्ण आढळलेला नाही. याशिवाय, डेंग्यूसदृश्य आजारांचे एकूण २९७ रुग्ण महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल होते.
लेप्टोच्या बळीनंतर एकूण १,९५६ घरांमधील ८ हजार २९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात १० जणांना ताप, ७ रुग्ण यूआरटीआयचे, तर ४ रुग्ण अतिसाराचे आढळून आले आहेत. तसेच या भागातील ६३२ घरांमधील १३१ उंदरांच्या बिळात धूम्रफवारणी आणि औषध फवारणी करण्यात आली. लेप्टोच्या रुग्णात वाढ होत असल्याने, मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण असून, पालिकेचा आरोग्य विभागही आता सतर्क झाला आहे.
पावसाळ्यातील बदलते वातावरण व त्यामुळे बिघडत जाणारे आरोग्य लक्षात घेता मुंबईकरांनीही दक्षता घ्यावी. बाहरेचे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे, तसेच सााथीची लक्षणे आढळल्यास त्वरित रुग्णालयात जाऊन औषधोपचार सुरू करावेत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

एकाच दिवसात दोघांची गमावला जीव
या वर्षी केवळ एकाच दिवसांमध्ये लेप्टोमुळे २ रुग्णांचे बळी गेले आहेत. २६ जूनला प्रथम कुर्ला येथील १५ वर्षीय मुलाचा बळी गेला. त्यानंतर, त्याच दिवशी गोवंडीतही २७ वर्षीय तरुणाचा लेप्टोमुळे मृत्यू झाला होता. आता २७ जूनला मालाड येथील २१ वर्षीय महिलेला लेप्टोमुळे जीव गमवावा लागला आहे.

डॉक्सिसायक्लीन औषधांचे वितरण
राबविण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक मोहिमेमुळे
आणि रुग्णांना देण्यात
आलेल्या ७४ हजार ७७२ डॉक्सिसायक्लीन औषधामुळे लेप्टोस्पायरोसीस आटोक्यात आला असून, यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही अशाच प्रकारे मोहीम हाती घेऊन, लेप्टो आटोक्यात आणत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.

Web Title: Lepto has three victims in Mumbai; Gastro's 779 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई