दसरा मुहूर्तावर वाहन नोंदणीला कमी प्रतिसाद

By admin | Published: October 23, 2015 02:27 AM2015-10-23T02:27:28+5:302015-10-23T02:27:28+5:30

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीबरोबरच वाहनखरेदी मोठ्या प्रमाणात करून त्याची नोंद केली जाते. परंतु यंदाच्या वर्षी मुंबईत वाहन

Less response to vehicle registration on Dussehra | दसरा मुहूर्तावर वाहन नोंदणीला कमी प्रतिसाद

दसरा मुहूर्तावर वाहन नोंदणीला कमी प्रतिसाद

Next

मुंबई : साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीबरोबरच वाहनखरेदी मोठ्या प्रमाणात करून त्याची नोंद केली जाते. परंतु यंदाच्या वर्षी मुंबईत वाहन नोंदणी फारच कमी झाली आहे, तर गेल्या तीन ते चार दिवसांत वाहनांची नोंद मोठ्या प्रमाणात केल्याचे समोर आले आहे.
दसऱ्याच्या दिवशी अनेकांकडून वाहन खरेदी केली जाते, तर वाहन मालकांकडून दसऱ्याच्या काही दिवस अगोदर वाहन नोंदणी करून प्रत्यक्षात वाहनाचा ताबा दसऱ्याच्या दिवशी घेतला जातो. हे पाहता आरटीओतर्फे वाहन नोंदणीसाठी मुंबईतील आरटीओतील वाहन नोंदणी विभाग व महसूल विभाग सुरू ठेवण्यात आले होते. ताडदेव कार्यालयात केवळ
३ चार चाकी आणि ४५ बाइकची नोंद करण्यात आली. या आरटीओत बुधवारी २00 चार चाकी व २५0 बाइकची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. वडाळा आरटीओतही ९ बाइक आणि एका चार चाकी वाहनाची नोंद झाली आहे. या नोंदणीतून १ लाख ६0 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. याच आरटीओत गेल्या तीन दिवसांत तब्बल ७00 बाइक आणि ३00 चार चाकी वाहनांची नोंद झाली आहे. दसऱ्याच्या दिवशी अंधेरी आरटीओत एकाही वाहनाची नोंद झाली नाही, तर बोरीवली आरटीओत फक्त १५ वाहनांचीच नोंद झाली. अंधेरी आरटीओत बुधवारी १00 बाइक व १५0 चार चाकी आणि बोरीवली आरटीओत ४00 बाइक, ३00 चार चाकींची नोंद झाली होती.

Web Title: Less response to vehicle registration on Dussehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.