एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी

By admin | Published: July 2, 2017 04:40 AM2017-07-02T04:40:19+5:302017-07-02T04:40:19+5:30

अन्य महामंडळाच्या तुलनेत राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा पगार कमी असल्याचा निष्कर्ष वेतन श्रेणी अभ्यास गटाने दिला आहे. परिवहन

Less of ST employees' salary | एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अन्य महामंडळाच्या तुलनेत राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा पगार कमी असल्याचा निष्कर्ष वेतन श्रेणी अभ्यास गटाने दिला आहे. परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडे वेतन श्रेणी अभ्यास गटाने शुक्रवारी वेतन श्रेणी अहवाल सादर केला. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी अहवालात १५ ते २२ टक्क्यांपर्यंत वेतन वाढ सुचवण्यात आली आहे. मान्यता प्राप्त संघटनेसोबत भविष्यात होणाऱ्या वाटाघाटीनंतर कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे तूर्तास वेतन
वाढ लांबणीवर ढकलल्याचे दिसून येत आहे.
मान्यता प्राप्त संघटनेच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन वाढ लागू करण्याच्या मागणीला बाजूला सारत एसटी प्रशासनाने वेतन विषयातील तज्ज्ञ समितीची नेमणूक केली होती. मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयात प्रशासनाने नेमलेल्या अभ्यासगटाने ३०० पानी अहवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सुपुर्द केला. या वेळी एसटी उपाध्यक्ष रणजित सिंह देओल आणि महाव्यवस्थापक माधव काळे उपस्थित होते.
सभागृहात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या मदतीने अहवालाचे वाचन करण्यात आले.
निवृत्त अधिकारी डी.आर. परिहार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण चार सदस्यीय अभ्यास गटाची नेमणूक करण्यात आली होती. या अभ्यास गटाने देशभरातील महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा अभ्यास केला. या वेळी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अन्य महामंडळाच्या तुलनेत कमी असल्याचा निष्कर्ष समितीने दिला. शिवाय कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ ते २२ टक्क्यांपर्यंत वाढ सुचवली आहे. एसटी प्रशासन आणि मान्यता प्राप्त संघटना यांच्या वाटाघाटीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Web Title: Less of ST employees' salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.