तलावांमध्ये १५ टक्के जलसाठा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 01:52 AM2018-08-10T01:52:45+5:302018-08-10T01:52:53+5:30
जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावून तलाव तुडुंब करणाऱ्या पावसाने गेल्या काही दिवसांमध्ये दडी मारली आहे.
मुंबई : जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावून तलाव तुडुंब करणाऱ्या पावसाने गेल्या काही दिवसांमध्ये दडी मारली आहे. यामुळे तलाव पूर्णपणे भरण्यास अद्याप १५ टक्के जलसाठा कमी पडत आहे. आजच्या घडीला गत तीन वर्षांच्या तुलनेत हा सर्वांत कमी जलसाठा आहे. परंतु पावसाळा आणखी दीड महिना असल्याने महापालिका प्रशासन आशावादी आहे.
या वर्षी जुलैमध्ये जोरदार पावसाने पाण्याचा प्रश्न मिटवला. दुसºयाच आठवड्यात तुळशी, विहार, तानसा, मोडक सागर असे सर्व प्रमुख तलाव भरून वाहू लागले होते. तर मध्य वैतरणा, भातसा आणि अपर वैतरणा तलावांमध्येही पाण्याची चांगली स्थिती होती. सध्या तलावांमध्ये एकूण ८५ टक्के जलसाठा आहे.
मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो. वर्षभर हा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार लीटर जलसाठा असणे आवश्यक असते. मात्र पावसाने बराच काळ उघडीप दिल्याने सध्या १२ लाख ३१ हजार म्हणजे ८५ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे १ आॅक्टोबरपर्यंत तलावांमध्ये उर्वरित १५ टक्के जलसाठा जमा होणे आवश्यक आहे.
>जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)
तलाव कमाल किमान आजची स्थिती
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १६१.०१
तानसा १२८.६३ ११८.८७ १२८.३७
विहार ८०.१२ ७३.९२ ७९.९९
तुळशी १३९.१७ १३१.०७ १३९.०४
अपर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ ६०१.७६
भातसा १४२.०७ १०४.९० १३६.६१
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २८३.३०
>मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो. वर्षभर हा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार लीटर जलसाठा असणे आवश्यक असते.
>असा आहे जलसाठा
(आकडेवारी दशलक्ष लीटरमध्ये)
२०१८ - १२ लाख ३१ हजार
२०१७ - १२ लाख ५७ हजार
२०१६ - १२ लाख ८५ हजार