अन्नाची नासाडी रोखण्यासाठी अभ्यासक्रमात धडा; विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचा सरकारचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 08:07 AM2022-12-28T08:07:10+5:302022-12-28T08:07:42+5:30

भारतात एकीकडे उपासमारीची समस्या आहे तर दुसरीकडे लाखो टन तयार अन्न वाया जाते.

lesson in the curriculum to prevent food wastage govt efforts to make students aware | अन्नाची नासाडी रोखण्यासाठी अभ्यासक्रमात धडा; विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचा सरकारचा प्रयत्न

अन्नाची नासाडी रोखण्यासाठी अभ्यासक्रमात धडा; विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचा सरकारचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई:भारतात एकीकडे उपासमारीची समस्या आहे तर दुसरीकडे लाखो टन तयार अन्न वाया जाते. याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी शालेय अभ्यासक्रमात अन्नधान्य बचतीचा धडा समाविष्ट केला जाऊ शकतो. अन्न फेकण्याच्या समस्येबाबत  विद्यार्थ्यांत जागृती घडवस ही पुढची पिढी अन्न फेकून देण्यापासून परावृत्त होईल असे सरकारला वाटते. अर्थतज्ज्ञ राकेश सिंग यांच्या मते अन्नाचे व्यवस्थापन करणे अवघड नक्कीच आहे, मात्र अशक्य नाही.

विद्यार्थी संवेदनशील होण्यास मदत होईल

- अन्न बचतीचा धडा विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवेल, असा विश्वास केंद्रीय अन्न-सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांना आहे. 

- स्वयंपाक घरात किंवा विशेष प्रसंगी फक्त आवश्यक तेवढेच अन्न शिजवले जाईल. काही कारणास्तव अन्न शिल्लक राहिले तर ते फेकून देण्याऐवजी गरजूंना दिले जाईल. त्यामुळे कचरा व्यवस्थापनास मदत होईल. 

कुठे होते नासाडी?

देशातील प्रत्येक व्यक्ती एका वर्षात ९४ किलो अन्न वाया घालवते. जाणूनबुजून किंवा नकळत ही हानी होते. स्वयंपाक घरात सरासरी ६.८८ कोटी टन अन्न कचरा निर्माण होतो. त्याचे प्रमाण प्रति व्यक्ती ५० किलो आहे. हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये दरडोई अन्नाची नासाडी २८ किलो आहे. मंडईपासून ते किराणा दुकानांपर्यंत अन्नधान्याची नासाडी प्रति व्यक्ती १६ किलो आहे.

- ४०% भारतात अन्नाची नासाडी, जगात हेच प्रमाण १७ टक्के आहे. 

- ८१कोटी लोक उपाशीपोटी झोपत होते.

- ९४ किलो अन्न प्रत्येक व्यक्ती वर्षभरात वाया घालवते.

- ६.८कोटी टन अन्न दरवर्षी घरांमध्ये होते खराब.

- २०३० पर्यंत अन्नाचा अपव्यय निम्मा करण्याचे लक्ष्य

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: lesson in the curriculum to prevent food wastage govt efforts to make students aware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.