मुंबई : अकरावी प्रवेशाच्या पहिल्या चार फेऱ्यांमध्ये प्रवेशाविना राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी बुधवारी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीत मुंबई विभागातून ३८ हजार ५६७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. मात्र, यातील तब्ब्ल १६ हजार १८१ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरविली. प्र्रवेश मिळूनही विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या चार फेºयांमध्ये प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, चार फेºयांमध्ये महाविद्यालयांकडून कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रवेश नाकारण्यात आलेले, गुणवत्ता यादीत नाव येऊनही प्रवेशासाठी महाविद्यालयांकडे न गेलेले, तसेच आधीच्या फेºयांमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी अशांसाठी ही विशेष फेरी होती.या फेरीत मुंबईतील एकूण ३८ हजार ५६७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. त्यातील केवळ २२,२९७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ६२ प्रवेश रद्द करण्यात आले आहेत, तर २७ प्रवेश नाकारण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा त्यांच्या प्रवेशाचा प्रश्न उभा ठाकला आहे.दरम्यान, राज्यात पार पडलेल्या विशेष फेरीतील एकूण ५८ हजार ६४३ विद्यार्थ्यांपैकी ३० हजार ४४० विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामधील २८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरविली आहे. ९१ प्रवेश रद्द करण्यात आले असून, ३७ प्रवेश महाविद्यालयांकडून नाकारण्यात आले आहेत.
१६ हजार विद्यार्थ्यांनी फिरविली प्रवेशाकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 5:46 AM