Join us

मुंबई विद्यापीठात गिरवा अभिनयाचे धडे

By admin | Published: June 19, 2014 10:40 PM

मुंबई विद्यापीठाचा अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स हा विभाग देशातीलच नव्हे, तर परदेशातील नाटय़ प्रशिक्षण देणा:या संस्थांमध्ये अग्रणी मानला जाऊ लागला आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स हा विभाग देशातीलच नव्हे, तर परदेशातील नाटय़ प्रशिक्षण देणा:या संस्थांमध्ये अग्रणी मानला जाऊ लागला आहे. या विभागात राबविले जाणारे विविध उपक्रम, नाटय़निर्मिती तसेच प्रशिक्षणाचा राखलेला दर्जा यामुळे या विभागाच्या कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर  घेतली आहे. 
गेल्या अकरा वर्षात अॅकॅडमीने सात राष्ट्रीय वसंत नाटय़ोत्सवांचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यात भारतातल्या मान्यवर दिग्दर्शकांची गाजलेली विविध भाषांतील नाटके सादर करण्यात आली आहेत. अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स या विभागाच्या वतीने दोन वर्षाचा मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स हा पूर्णवेळ अभ्यासक्रम राबविला जातो. 
या अभ्यासक्रमात प्रामुख्याने अभिनय, नाटय़दिग्दर्शन, नाटकाची तांत्रिक अंगे, नाटय़वा्मय व नाटय़इतिहास, नाटय़निर्मिती व त्यातील सहभाग, नाटय़लेखन, नाटय़समीक्षा आदी विषय शिकवले जातात. या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे या अभ्यासक्रमात सिद्धांत व प्रात्यक्षिकांचे प्रमाण अनुक्रमे 4क् व 6क् टक्के असे जाणीवपूर्वक ठेवण्यात आले आहे. दोन वर्षाच्या या अभ्यासक्रमामध्ये विद्याथ्र्याना नामांकित दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनाखाली सादर होणा:या तीन नाटय़निर्मितीमध्ये सहभागी होणो आवश्यक असते. या अभ्यासक्रमामध्ये विद्याथ्र्याना दोन वर्षात एक तरी 
नाटक दिग्दर्शित करणो अनिवार्य असते.
अॅकॅडमीच्या या विभागामध्ये नाटय़शिक्षण देण्यासाठी देश-परदेशातून तज्ज्ञ व दिग्गज कलावंतांना आमंत्रित केले जाते. आतार्पयत या विभागात प्रशिक्षण देण्यासाठी भालचंद्र पेंढारकर, डॉ. जब्बार पटेल, वामन केंद्रे, सतीश आळेकर, गोविंद नामदेव, रोहिणी हट्टंगडी, रीमा लागू, चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे तर परदेशातून ली जेम्स, गाय बिरान, यास्मिन ब्राऊन, जॉन हेगले, जेसेल 
बोको, हॉकूर गन्नारसन आदींनी 
विविध विषयांमध्ये मार्गदर्शन दिले आहे.
अॅकॅडमीच्या 2क्14-15 या वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी थिएटर आर्ट्समध्ये करिअर करू पाहणा:या तरुण पिढीने अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दुसरा 
मजला, विद्यानगरी कॅम्पस, कलिना, सांताक्रूझ या पत्त्यावर संपर्क साधावा. किंवा मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती मिळेल. (प्रतिनिधी)