राणीच्या बागेत मिळणार शहरी शेतीचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 07:51 AM2023-05-31T07:51:23+5:302023-05-31T07:51:34+5:30
३ जून रोजी ही कार्यशाळा होणार असून, या कार्यशाळेत १० वर्षांवरील मुलांनाही सहभागी होता येणार आहेत.
मुंबई : राणीच्या बागेत फिरायला जाणाऱ्या मुंबईकरांना लवकरच शहरी शेतीचे धडे मिळणार आहेत. लहान जागेत हिरव्या भाज्यांची लागवड, मायक्रोग्रीन वाढविण्याचे तंत्र, बाजरीचे पौष्टिक मूल्य याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ३ जून रोजी ही कार्यशाळा होणार असून, या कार्यशाळेत १० वर्षांवरील मुलांनाही सहभागी होता येणार आहेत.
मुंबई महापालिका, केंद्रीय चिडिया घर प्राधिकरण, नॅच्युरलिस्ट फाउंडेशन आणि सृष्टीज्ञानच्या वतीने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे ३ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. लहान जागेत पोषक समृद्ध मायक्रोग्रीन वाढविण्याचे तंत्र, हिरव्या भाज्यांची लागवड याबाबत माहिती दिली जाणार आहे. या कार्यशाळेत निवडक लोकांना प्रवेश दिला जाणार असून, अधिक माहितीसाठी मुंबई प्राणिसंग्रहालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.