मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात धावत असलेल्या आणि धावणा-या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून मेट्रो प्रशासन सातत्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि कर्मचा-यांच्या प्रशिक्षणावर भर देत आहे. याच प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून नुकतेच २५ कर्मचा-यांना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीचे प्रशिक्षण देण्यात आले असून, या सर्व प्रकाराच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे.महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या सिटी इन्स्टिटयुट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पहिल्या बॅचला प्रशिक्षण देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतूदीनुसार मेट्रोच्या गरजांना अनुसरुन हा प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. मेट्रो स्थानकांमध्ये आरोग्यविषयक किंवा आगीसारख्या आपत्ती उद्वभल्यास त्यावर प्रथमोपचार तसेच अग्निशमन उपाय योजनांसह त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सर्व कर्मचारी तयार असून, यासाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे.मुंबईला हादसो का शहर म्हटले जाते. येथे सातत्याने काही ना काही घटना घडत असतात. मुंबईत आगी लागण्याचे प्रमाण अधिक आहे. पावसाळ्यात पाणी साचून मुंबई तर प्रत्येक पावसाळ्यात बंद पडत असते. कोणती आपत्कालीन घटना कधी घडेल सांगता येत नसते. परिणामी सारासारा याचा विचार करत मेट्रोच्या कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले जात आहे. याद्वारे अशा प्रशिक्षणातून हे कर्मचारी आपल्या प्रवाशांना अशा घटनांतून सुखरुप बाहेर काढतील. किंवा परिस्थितीवर नियंत्रण मिळवतील, हा या प्रशिक्षणामागचा हेतू आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून आता मोठया प्रमाणावर मेट्रोची कामे सुरु आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो धावत असून, मेट्रो-२ अ आणि ब याचे कामे देखील वेगाने सुरु आहे. दुसरीकडे उर्वरित मेट्रोची कामे वेगाने सुरु असून, २०३० पर्यंत बहुतांशी मेट्रो वेगाने रुळावर दाखल झालेल्या असतील. साहजिकच तेव्हा मेट्रोने प्रवास करणा-यांचा प्रवास सर्वाधिक असेल. याचा सारासार विचार करत असे अनेक प्रोग्राम हाती घेण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी केली जात आहे.