केडीएमसीने गिरविले कचरा व्यवस्थापनाचे धडे

By admin | Published: June 12, 2015 03:33 AM2015-06-12T03:33:04+5:302015-06-12T03:33:04+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतांनुसार घनकचरा विघटनासह डम्पिंग समस्या सोडविण्यासाठी विशिष्ट यशस्वी प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी केडीएमसीचे आयुक्त

Lessons of waste management by KDMC | केडीएमसीने गिरविले कचरा व्यवस्थापनाचे धडे

केडीएमसीने गिरविले कचरा व्यवस्थापनाचे धडे

Next

अनिकेत घमंडी, डोंबिवली
मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतांनुसार घनकचरा विघटनासह डम्पिंग समस्या सोडविण्यासाठी विशिष्ट यशस्वी प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी केडीएमसीचे आयुक्त आणि सत्ताधारी-विरोधी पदाधिकारी दोन दिवसांच्या हैदराबाद-वारंगलच्या टूरवर आहेत. गुरुवारी वारंगल महापालिकेच्या घनकचरा डम्पिंग प्रकल्पाची या शिष्टमंडळाने पाहणी केली. लोकसंख्येच्या तुलनेत केडीएमसी आघाडीवर असली तरी घनकचरा व्यवस्थापनात वारंगल महापालिका सरस असल्याची स्पष्टोक्ती आयुक्त मधुकर अर्दड यांनी हैदराबादहून ‘लोकमत’ला दिली.
त्यांच्यासमवेत या दौऱ्यामध्ये महापौर कल्याणी पाटील, विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे, मनसेचे सुदेश चुडनाईक, सभागृह नेते कैलास शिंदे, उमेश बोरगावकर, विद्याधर भोईर आदींसह महापालिकेच्या अन्य अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. वारंगलमध्ये या शिष्टमंडळाला तेथील आयुक्त सरफराज अहमद यांनी मार्गदर्शन केले. या ठिकाणी २ बायोगॅस प्लांट असून ते सद्य:स्थितीत बंद असून लवकरच त्यातील एक सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Lessons of waste management by KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.