निवडणुकीत होऊ द्या खर्च
By admin | Published: September 23, 2014 11:30 PM2014-09-23T23:30:06+5:302014-09-23T23:30:06+5:30
निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले दर हे सद्यस्थितीतील दरांपेक्षा खूपच कमी असल्याने, निवडणूक प्रचारात अधिक खर्च करण्याची संधी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मिळणार आहे.
जयंत धुळप, अलिबाग
निवडणूक खर्चाबाबत उमेदवार व राजकीय पक्षांनी बिनचूक माहिती सादर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना केले आहे.
मात्र निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले दर हे सद्यस्थितीतील दरांपेक्षा खूपच कमी असल्याने, निवडणूक प्रचारात अधिक खर्च करण्याची संधी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मिळणार आहे.
मंडप, प्रचार सभाही होणार स्वस्त
निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने होणाऱ्या प्रचार सभा आणि त्या निमित्ताने उभारण्यात येणारे मंडप यांचा मोठा खर्च राजकीय पक्षांना व त्यांच्या उमेदवारांना असतो परंतु त्यांच्या दरातही वास्तवातील दरापेक्षा खूप मोठी तफावत आहे. निवडणूक आयोगाने निश्चित केलेले दर आणि कंसातील प्रत्यक्ष दर पाहिल्यावर ही तफावत लक्षात येते.
जाहीर सभांसाठी लाऊडस्पीकरचे दर ३५०० रु पये (५०००) , अतिरिक्त लाऊड स्पीकरकरिता ५०० रुपये (१०००), प्रचार/ फेरी/कोपरा/चौक सभा याकरिता १२०० रु पये प्रति दिवस (३०००),मंडपासाठी लागणारे चौरस फूट दर ८ रु पये प्रति फूट(२२ ते २५ रुपये), कापडी फलक प्रति चौरस फूट १८ रु पये (६०) आदी.