Join us  

महाराष्ट्रातून प्रकल्प जातात याचं वाईट वाटतं नाही....; राज ठाकरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 8:05 PM

महाराष्ट्रातून एकामागोमाग एक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. मला प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेल्याच वाईट वाटत नाही, ते एखाद्या मागासलेल्या राज्यात गेले असते तरी हरकत नव्हती.

मुंबई- महाराष्ट्रातून एकामागोमाग एक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. मला प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेल्याच वाईट वाटत नाही, ते एखाद्या मागासलेल्या राज्यात गेले असते तरी हरकत नव्हती. देशातील प्रत्येक राज्य प्रगत होऊ दे, पण मोदींनी फक्त गुजरात गुजरात करू नये ही अपेक्षा आहे, असं स्पष्ट मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. आज मुंबईतील गोरेगावमधील नेस्कोला येथे सायंकाळी मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे संबोधित केले. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.   "महाराष्ट्रातून इतके उद्योग गुजरातला चालले आहेत, यावर धोतर का नाही बोलले?, असा टोलाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला. गुजराती आणि मारवाडी महाराष्ट्रातून  गेले तर महाराष्ट्राचं काय होईल,  असं कोश्यारी म्हणाले, माझा प्रश्न आहे की मग गुजराती मारवाडी त्यांचे राज्य सोडून महाराष्ट्रात का आले?, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

"स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात घ्यायचा आणि बागेत कोपऱ्यात बसायचं..," राज ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जात आहेत. काय चाललंय काय? ते फक्त गुजरातमध्ये जातायत म्हणून मला खंत नाही. देशातल्या कोणत्याही राज्यात जावेत, खंत ती नाहीच. पण पंतप्रधान प्रत्येक राज्याकडे समान पद्धतीने बघतील अशी अपेक्षा होती. मग हे असं का घडतंय?, असा सवालही राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. 

"स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात घ्यायचा आणि बागेत कोपऱ्यात बसायचं..,"

मुख्यमंत्री पदावर असताना तब्येतीचे कारण सांगून घरी बसले होते. आणि आता एकनाथ शिंदे यांनी रात्रीत कांडी फिरवल्यामुळे सगळीकडे फिरत आहेत, हे लोक  सत्तेसाठी कुणाचाही हात हातात घेतात, असा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. आज मुंबईतील गोरेगावमधील नेस्कोला येथे सायंकाळी मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे संबोधित केले. यावेळी बोलताता राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.  

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका केली. राजपाल तुम्ही गुजराती आणि मारवडींना विचारा तुम्ही महाराष्ट्रात का आले आहात. तुम्हाला तुमचं राज्य नव्हत का, असा प्रश्न देखीन त्यांनी केला.

टॅग्स :राज ठाकरेशिवसेनाभाजपानरेंद्र मोदी