‘मला बी टूरला जाऊ द्या की़

By Admin | Published: January 8, 2016 02:27 AM2016-01-08T02:27:15+5:302016-01-08T02:27:15+5:30

परदेशी अभ्यास दौऱ्यांवर केवळ अधिकारीच जात असल्याने बेस्ट समितीचे सदस्य खट्टू झाले आहेत़ अशा टूरवर जाण्याची संधी सदस्यांनाही मिळावी

'Let me go to B tour | ‘मला बी टूरला जाऊ द्या की़

‘मला बी टूरला जाऊ द्या की़

googlenewsNext

मुंबई : परदेशी अभ्यास दौऱ्यांवर केवळ अधिकारीच जात असल्याने बेस्ट समितीचे सदस्य खट्टू झाले आहेत़ अशा टूरवर जाण्याची संधी सदस्यांनाही मिळावी, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी आज केली़ मात्र यासाठी केंद्राची
परवानगी आवश्यक असल्याने महाव्यवस्थापकांनी हात वर केले़
परदेशातील योजनांचा अभ्यास करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात येत असते़ या अभ्यास दौऱ्यातून अधिकारी काहीही शिकून आले, तरी त्याची अंमलबजावणी मुंबईत अपवादानेच होते़ त्यामुळे अशा टूर या शासकीय खर्चातील सहली ठरत असतात़ अशा या सहलींना जाण्याची संधी मिळत नसल्याने बेस्ट समिती सदस्य कमालीचे चिडले आहेत़
अशा टूरला सदस्यांना का पाठविण्यात येत नाही, याचा जाब सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत आज विचारला़ परदेशातून शिकून आल्यानंतर किती प्रकल्प येथे आणले, याचा अहवाल सदस्यांनी मागविला़ मात्र सदस्यांना पाठविण्यास आपली काही हरकत नाही़ पण आधी केंद्राची परवानगी घ्या, अशी गुगली टाकत महाव्यवस्थापकांनी सदस्यांची बोलती बंद केली़ (प्रतिनिधी)

Web Title: 'Let me go to B tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.