मुंबई- सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खासगी हॉस्पिटलकडून अनेकांची लूट आहे. कोरोना पेशंटचे बिल लाखोंच्या घरात जात आहे. यावर आवर घालण्यासाठी सरकारने त्यांचे खासगी रुग्णालयासाठी दरपत्रक जाहीर केले आहे; परंतु या दरपत्रकाप्रमाणे कार्यवाही होताना दिसत नाही.
महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भीमेश मुतुला यांनी नुकतीच त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट टाकली.
मुंबईतील नागरिकांना जर खासगी रुग्णालयाने चढ्या दराने बिल घेतले तर त्यांना कळवण्याची विनंती केली आहे.
सरकारने जाहीर केलेल्या दरांप्रमाणे एका दिवसासाठी जनरल वाॅर्ड विलगीकरण ४००० रुपये, आयसीयू (व्हेंटिलेटरशिवाय) विलगीकरण ७५०० व आयसीयू (व्हेंटिलेटरसह विलगीकरण) ९००० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे.
रुग्णाची नियमित देखभाल, रक्त व लघवी तपासणी, इतर तपासण्या सोनोग्राफी,२ डी इको, एक्सरे, इसीजी, मर्यादित किरकोळ औषधे, डॉक्टर तपासणी, नर्सिंग चार्जेस, जेवण, छोटे उपचार, नाकातून नळी टाकणे, लघवीसाठी नळी टाकणे, पीपीई कीट, केमोपोर्ट लावणे, छातीतील, पोटातील पाणी काढणे, इत्यादी गोष्टींकरिता वेगळा चार्ज हॉस्पिटल आकारू शकतात.
जर हॉस्पिटल जादा पैसे घेत असतील तर, भीमेश मुतुला यांच्याशी mutulabhimesh1986@gmail.com यावर तक्रार देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.