मुंबई : देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे. अन्नदाता शेतकरीराजा, कष्टकरी, मेहनती उद्यमी बांधवांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलचरणी घातले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी ही प्रार्थना अर्पण केली आहे. तसेच राज्यातील जनतेला कार्तिक एकादशीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छाही दिल्या आहेत.
कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८) व कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा.शिरोडी खुर्द, फुलंबी जि. औरंगाबाद) या दापत्याची निवड करण्यात आली. यामुळे साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विठ्ठलाची शासकिय महापूजा करता आली आहे.
कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मानाच्या वारकरी म्हणून दर्शन रांगेतून माळकरी भाविकाची निवड केली जाते. यंदाच्या वर्षी हा उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८) व कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा.शिरोडी खुर्द, फुलंबी जि. औरंगाबाद) यांना मिळाला असून हे पती-पत्नी मागील ५० वर्षापासून विठुरायाचे यात्रा करत आहेत. त्यांना दोन मुले, २ मुली व नातवंडे असा परिवार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.