Join us  

'दूध का दूध और पानी का पानी' होण्याची गरज; तपास यंत्रणांना त्यांचे काम करु द्या- प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 5:11 PM

सोनिया गांधींच्या ईडीच्या चौकशीवर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- नॅशनल हेराल्डप्रकरणी  सुरू असलेली  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी चौकशी संपली. सोनिया गांधी यांची चौकशी तब्बल तीन तास सुरू होती.  सोमवारी सोनिया गांधी यांना पुन्हा  चौकशीला  बोलावण्याची शक्यता आहे. 

ईडाचा या कारवाईचा निषेध करत काँग्रेसचे कार्यकर्ते देशभर रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले असून त्याचा फटका वाहतूकीला बसल्याचे दिसले. दिल्ली पासून उत्तर प्रदेश पर्यंत सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

सोनिया गांधींच्या या चौकशीवर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर नाही त्याला डर असायचे काही कारण नाही. अशाप्रकारे आंदोलनाची नौटंकी करुन त्यातून काही साध्य होणार नाही. त्यामुळे तपास यंत्रणांना त्यांचे काम करु द्या. त्या निष्पक्षपातीपणे निश्चितच काम करत असतात. काही चुकीचे नसेल तर आपली न्यायव्यवस्था व तपास यंत्रणा जाणीवपूर्वक कुणावर ही कारवाई करत नसते, त्यामुळे 'दूध का दूध और पानी का पानी' होण्याची गरज आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

दरम्यान, ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची तीन टप्प्यात चौकशी केली जाईल. प्रश्नांच्या पहिल्या टप्प्यात, त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारले जातील ज्यांची संख्या 10 पर्यंत असू शकते. या प्रश्नांमध्ये ती आयकर विभागात कर भरता का? त्यांचा पॅन क्रमांक काय आहे? देशात त्यांची कुठे-कुठे मालमत्ता आहे? परदेशात मालमत्ता कुठे आहे? त्यांची किती बँक खाती आहेत? कोणत्या बँकेत खाती आहात?, याबाबत ईडी चौकशी करणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

टॅग्स :सोनिया गांधीअंमलबजावणी संचालनालयप्रवीण दरेकर