आम्हाला फाशी द्या! वृद्ध दाम्पत्याची विनवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 07:04 AM2018-03-10T07:04:04+5:302018-03-10T07:04:04+5:30

सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाचा दिलेला निर्णय आमच्यासाठी नाही. आम्ही राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राचा या प्रकरणात विचारच करण्यात आलेला नाही. आम्हाला मरण हवंय, कायद्याने आम्हाला फाशी द्या... अशी आर्त विनवणी गिरगावातील लवाटे दाम्पत्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केली आहे.

 Let us hang out! An elderly couple's request | आम्हाला फाशी द्या! वृद्ध दाम्पत्याची विनवणी

आम्हाला फाशी द्या! वृद्ध दाम्पत्याची विनवणी

Next

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाचा दिलेला निर्णय आमच्यासाठी नाही. आम्ही राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राचा या प्रकरणात विचारच करण्यात आलेला नाही. आम्हाला मरण हवंय, कायद्याने आम्हाला फाशी द्या... अशी आर्त विनवणी गिरगावातील लवाटे दाम्पत्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी इच्छामरणाला सशर्त परवानगी दिली. मात्र हा निर्णय समाधानकारक नसल्याची खंत लवाटे दाम्पत्याने व्यक्त केली. गिरगावात झाबवावाडीतील लक्ष्मीचाळीत राहणारे नारायण लवाटे आणि इरावती लवाटे हे दोघे जवळपास १९८७ सालापासून इच्छामरणासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करीत आहेत. आमच्यासारख्या धडधाकट माणसांना इच्छामरण हवे असल्यास त्यांनी कुणाकडे जायचे, असा खडा सवाल इरावती लवाटे यांनी शासकीय यंत्रणांना केला. आम्हाला दोघांनाही अवयवदान करायचे आहे, आम्हाला कुठलाही आजार नाही. त्यामुळे अवयवदान करून वेळीच कुणाच्या तरी उपयोगी पडण्याची इच्छा आहे. त्यासाठीच त्वचेपासून सर्व अवयवदान करायचा निर्णय आम्ही घेतला आहे. दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया झाल्यापासून आता आमचे बाहेर फिरणे बंद झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक आयुष्य फारसे उरलेले नाही. आम्हाला परावलंबित्व नको आहे, त्यामुळे इच्छामरण पाहिजे आहे, अशी मागणी इरावती लवाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
नारायण लवाटेही सांगतात की, आमचे परिपूर्ण जीवन जगून झाले आहे. आम्हाला आता जगायची इच्छा नाही. त्यामुळे या निर्णयाकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या, मात्र आमचा अपेक्षाभंग झाला आहे. समाजाने आमच्यासाठी काही करावे असे अजिबात वाटत नाही. त्यामुळे गेली कित्येक वर्षे यासाठी आमचा लढा सुरू आहे, असेही त्यांनी तळमळीने सांगितले.

३१ मार्चपर्यंत अल्टिमेटम

डिसेंबर २०१७ मध्ये राष्ट्रपतींना पत्र लिहिले असून,
३१ मार्चपर्यंत आम्हाला उत्तर न मिळाल्यास टोकाचे पाऊल उचलावे लागेल, असे या जोडप्याचे म्हणणे आहे.

सुशिक्षित दाम्पत्य : गिरगावातील आर्यन शाळेत इरावती लवाटे या मुख्याध्यापक पदावर कार्यरत होत्या. तर नारायण लवाटे हे १९८९ साली राज्य परिवहन विभागातून निवृत्त झाले आहेत. इरावती यांचे वय ७८ तर नारायण यांचे वय ८७ आहे. गिरगावातील झावबावाडीतील लक्ष्मीबाई चाळीत ते राहतात. एप्रिल महिन्यात त्यांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. या दाम्पत्याला मूलबाळ नाही.

राष्ट्रपतींवर अवमान याचिका दाखल करणार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्राला प्रतिसाद न दिल्यास त्यांच्यावरच अवमान याचिका दाखल करण्याची तयारीही लवाटे दाम्पत्याने केली आहे.

Web Title:  Let us hang out! An elderly couple's request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई