लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्यांनी जीवन वेचलं, ज्यांनी शिवसेनेसाठी आयुष्य खर्ची घातलं त्यांची बदनामी केली जात आहे. सहन करण्याची एक मर्यादा असते. मी सहनशील असेन. मात्र, आमचे ५० आमदार सहनशील नाहीत. सतत असंच डिवचत राहिलात तर फ्रीजच्या खोक्यातून, ट्रंकमधून कोणाला किती पैसे आले, हे अनेकजण माफीचा साक्षीदार बनून उघड करतील. त्यातून तुमचं खरं रूप जनतेसमोर येईल, असा इशारा मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे यांना दिला.गुवाहाटी येथे पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या चिखली सभेतील वक्तव्याचा समाचार केसरकर यांनी घेतला.
मी हवेत गप्पा मारत नाही : फडणवीसशेतकऱ्यांच्या वीजबिल माफीबाबत बोलताना ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करीत महावितरणला वीजबिल वसुली थांबविण्याचा दिलेला आदेश पोस्ट केला. जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही, असे त्यांनी म्हटले.