मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे अनेक कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. नोकरदारांच्या नोकऱ्या गेल्या तर कित्येक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. अशा गरजू कुटुंबांच्या घरातही यंदाच्या दिवाळीत सुखाच्या प्रकाशाची काही किरणे यावीत यासाठी शिवसेना विभाग क्र १ चे विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस व श्रीमंत माऊली प्रतिष्ठानचे विनीत सबनीस, विनायक सामंत यांच्यातर्फे " दिवाळी साजरी करुया गरजवंतांच्या समवेत "या उपक्रमाला आजपासून प्रारंभ करण्यात आला.
या उपक्रमा अंतर्गत दहिसर विभागातील गरजू कुटुबांना दिवाळी फराळ, दिव्यांच्या रोषणाईचे तोरण, सुगंधी उटणे, साबण, रांगोळी इ. दिवाळी उपयुक्त सामान देऊन मदत करण्यात येणार आहे अशी माहिती विनीत सबनीस, विनायक सामंत यांनी दिली. या उपक्रमाचा प्रारंभ प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातील डोअर किपर्स ( द्वारपाल) जे गेले आठ महिने बेरोजगार आहेत त्यांना आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते दिवाळी भेट देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमास शिवसेना विभागप्रमुख ,आमदार विलास पोतनीस, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर, उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे , उपविभागसंघटक दीपा पाटील, विधानसभा संघटक बाळकृष्ण ढमाले व इतर मान्यवर उपस्थित होते.