पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करूया, गड किल्ले बनवूया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 03:58 PM2020-11-06T15:58:21+5:302020-11-06T15:58:49+5:30
Eco friendly Diwali : सर्व कुटुंब सहभागी होवू शकते
मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे यंदाची दिवाळीपर्यावरणपूरकदिवाळी साजरी करूया, गड किल्ले बनवूया, असे आवाहन करण्यात आले आहे. या करिता किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या स्पर्धेत सर्व कुटुंब सहभागी होवू शकते. किल्ला नैसर्गिक व पर्यावरणपूरक वस्तू वापरून बनवायचा आहे. उदा. माती, विटा, फुले, पाने, डहाळ्या, दोरखंड इत्यादीचा वापर करावा. थर्माकोलचा वापर करू नये.
किल्ला बनवत असतानाचा २ मिनिटांचा व्हिडीओ व किल्ला बनवून पूर्ण झाल्यावर त्याचे विविध बाजूंनी घेतलेले २-३ फोटो समितीला पाठवावेत. किल्ल्याचे फोटो व व्हिडिओ पाठवायची अंतिम तारीख १६ नोव्हेंबर आहे. दरम्यान, यंदाची दिवाळी पर्यावरण पूरक साजरी करूया, असे आवाहन समितीने केले आहे.