चला चला पंढरीला! आषाढीसाठी धावणार पाच हजार बस, ग्रुप बुकिंग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून जा थेट पंढरपूरपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 01:46 PM2024-06-13T13:46:27+5:302024-06-13T13:46:43+5:30

Pandharpur Wari: पंढरीची आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी अनुपम सोहळा असतो. आषाढी एकादशीचा हा सोहळा १७ जुलै रोजी संपन्न होत आहे. यात्रेसाठी एसटी महामंडळानेदेखील तयारी सुरू केली असून, यंदा यात्रा काळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Let's go to Pandhari! 5000 buses will run for Ashadhi, if there is a group booking, go directly to Pandharpur from any village of the state | चला चला पंढरीला! आषाढीसाठी धावणार पाच हजार बस, ग्रुप बुकिंग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून जा थेट पंढरपूरपर्यंत

चला चला पंढरीला! आषाढीसाठी धावणार पाच हजार बस, ग्रुप बुकिंग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून जा थेट पंढरपूरपर्यंत

 मुंबई - पंढरीची आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी अनुपम सोहळा असतो. आषाढी एकादशीचा हा सोहळा १७ जुलै रोजी संपन्न होत आहे. यात्रेसाठी एसटी महामंडळानेदेखील तयारी सुरू केली असून, यंदा यात्रा काळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. फुकट्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत. रस्त्यावर कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होऊ नये म्हणून स्थानिक पोलिस प्रशासनाच्या मदतीने ३६ पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ४२४५ विशेष बस सोडल्या होत्या. याद्वारे १८ लाख ३० हजार ९३४ प्रवाशांची एसटीने ने-आण केली होती.

सवलती लागू
७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. 

तात्पुरती चार स्थानके
पंढरपूर येथे होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. बसस्थानकावर पिण्याचे पाणी, शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक या सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

 बसस्थानकाचे नाव     जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बस 
चंद्रभागा     मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
भीमा यात्रा देगाव    छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती प्रदेश
विठ्ठल कारखाना    नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
पांडुरंग     सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

Web Title: Let's go to Pandhari! 5000 buses will run for Ashadhi, if there is a group booking, go directly to Pandharpur from any village of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.