महामुंबई कशी साकारता तेच बघू!
By Admin | Published: September 4, 2016 03:22 AM2016-09-04T03:22:47+5:302016-09-04T03:22:47+5:30
मोखाड्यातील मध्य वैतरणा धरण प्रकल्पाचे पाणी मुंबई ला नेताना या भागाच्या विकासाची जबाबदारी जर मुंबई महानगर पालिका घेणार नसेल तर माझ्या भागातील पाण्या शिवाय
पालघर : मोखाड्यातील मध्य वैतरणा धरण प्रकल्पाचे पाणी मुंबई ला नेताना या भागाच्या विकासाची जबाबदारी जर मुंबई महानगर पालिका घेणार नसेल तर माझ्या भागातील पाण्या शिवाय तुम्ही भविष्यात महामुंबई चे स्वप्न कसे पूर्ण करणार आहात? आणि त्यासाठी आता तुम्हाला किती सहकार्य करायचे याचा मला गांभिर्याने विचार करावा लागेल असा गर्भित इशारा पालघर लोकसभेचे खासदार चिंतामण वनगा यांनी एका कार्यक्रमात दिला.
मोखाड्यातील मध्य वैतरणा धरणाचे नामकरण दरम्यान खासदार वनगा याना निमंत्रण नसल्याने ते खूप व्यथित झाले असून इथले पाणी वसई-विरार, मुंबई ला देण्यात येत असताना इथला स्थानिक आदिवासी बांधव आणि महिलांना मात्र फेब्रुवारी महिन्या पासूनच पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागते. अश्या वेळी स्थानिकाच्या हक्काचे पाणी पळवून ते इतर भागाला देताना स्थानिकांच्या हक्क मात्र डावलले जाते. हे मी कदापी सहन करणार नाही असे सांगून या प्रकल्पाला मी सर्वोतोपरी सहकार्य करीत असताना त्यांना डावलले गेल्याने ते अत्यंत संतप्त झाले आहेत. आघाडी सरकारच्या सत्ते दरम्यान या पाणी प्रश्ना बाबत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांनी मला चर्चे साठी तीन वेळा बोलावीत माझी मते जाणून घेतली होती. (प्रतिनिधी)
थेट शिवसेनेला केले टार्गेट
मुंबईला अधिक पाणी पुरवठा करण्या दरम्यान दमण गंगा पिंजाळ प्रस्ताव सन २०१९ नंतर सुरु होऊन सन २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येऊन पाणीपुरवठा सुरु होणार आहे. त्या दरम्यानही माझे सहकार्य हवे कि नको असा इशारा त्यांनी शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगर पालिकेला दिला.
आपली पुढची याबाबत काय भूमिका असेल असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारले असत ‘मी आयुष्यभर संघर्षाचे जीवन जगत आलो आहे, या भागातील सर्व आदिवासी बांधव माझ्या पाठीशी आहे अशा वेळी त्यांच्या विकासा संदर्भात मुंबई महानगरपालिका कुठलीही जबाबदारी उचलायला तयार होत नसेल तर माझ्या भागातील पाण्याशिवाय तुम्हचे महामुंबईचे स्वप्न कसे पूर्ण होते ते बघुया ’ असा परखड इशारा त्यांनी बोईसर येथील कौशल्य विकास कार्यक्रमादरम्यान दिला.