शाडूच्या मातीपासून मूर्ती घडविताना या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा नवनिर्मितीचा अवीट, अविस्मरणीय आनंद "चला बाप्पा घडवूया" या उपक्रमप्रसंगी उपस्थितांना अनुभवायला मिळाला. या स्पर्धेसाठी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना मुंबई महापालिकेचे शहर स्थापत्य समिती अध्यक्ष तसेच नगरसेवक दत्ता पोंगडे, समाजसेवक डाॅ. प्रागजी वाजा यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत रिया हनुमंत मेस्त्री हिने प्रथम क्रमांक, तर संजना ठाकूर हिने द्वितीय क्रमांक व सोसम नाखवा याने तृतीय क्रमांक पटकावला तसेच अंशुमन मुकेश पाटील, धृती कनोजिया, अमेय शिंदे, निधी हरिया आणि हर्षवर्धन गायकवाड यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
--------------------------------------------------------