लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. हा काळ मोठा कठीण आहे. कारण या काळात आरोग्याच्या विशेषत: रक्ताच्या तुटवड्याच्या अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात रक्ताचा असा तुटवडा भासू नये आणि समाजाप्रति आपण काही तरी देणे लागतो या भावनेने स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समूहाने २ ते १५ जुलैदरम्यान महाराष्ट्रात आयोजित केलेल्या ‘लोकमत - रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊ या, असे आवाहन वांद्रे - कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्समधील हिरे व्यापाऱ्यांनी नागरिकांना केले. शिवाय उपक्रमाकरिता ‘लोकमत समूहा’चे अभिनंदन करीत त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनूप मेहता म्हणाले, लोकमतचा उपक्रम स्तुत्य आहे. कोरोना काळात भासणारा रक्ताचा तुटवडा भरून काढता येईल. श्री रामकृष्ण एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राहुल ढोलकिया यांनी, कोरोना काळात आरोग्य सुविधेला हातभार लावणारा उपक्रम हाती घेतल्याने अभिनंदन केले. लक्ष्मी डायमंड प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अशोक गजेरा यांनी, कोरोना काळात प्रत्येकाने रक्तदान करून समाजाचे ऋण व्यक्त करावे, असे म्हटले. भारत डायमंड बोर्सचे उपाध्यक्ष मेहुल शाह यांनी, दर्डा कुटुंबाने असा उपक्रम आयोजित केल्याने त्याचा नक्कीच समाजाला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. किरण जेम्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक दिनेश लाखानी यांनी, कोरोना काळात जाणवत असलेल्या रक्त टंचाईदरम्यान हा उपक्रम दिलासा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. रेवाशंकर जेम्स लिमिटेडचे अध्यक्ष प्रवीण शंकर पंड्या यांनी आपण समाजाप्रति काही तरी देणे लागतो, असे म्हणत ‘लोकमत’ला शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पक्षाचे मुंबई खजिनदार आणि हिरे व्यापारी किरीट भन्साळी यांनी दर्डा कुटुंबाने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे कौतुक केले. हे शिबिर समाजाला निश्चितच लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. रोसी ब्ल्यूचे व्यवस्थापकीय संचालक रुस्सेल मेहता यांनीदेखील कोरोना काळात हा उपक्रम दिलासादायक असल्याचे म्हटले. दरम्यान, भारत डायमंड बोर्ससह उर्वरित सर्व घटकांतील रक्तदात्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनदेखील या सर्वांनी केले.
------------------------
अनूप मेहता, अध्यक्ष, भारत डायमंड बोर्स
राहुल ढोलकिया, व्यवस्थापकीय संचालक, श्री रामकृष्ण एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड
अशोक गजेरा, व्यवस्थापकीय संचालक, लक्ष्मी डायमंड प्रायव्हेट लिमिटेड
मेहुल शाह, उपाध्यक्ष, भारत डायमंड बोर्स
दिनेश लाखानी, संचालक, किरण जेम्स प्रायव्हेट लिमिटेड
प्रवीण शंकर पंड्या, अध्यक्ष, रेवाशंकर जेम्स लिमिटेड
किरीट भन्साळी, हिरे व्यापारी आणि खजिनदार, मुंबई, भारतीय जनता पक्ष
रुस्सेल मेहता, व्यवस्थापकीय संचालक, रोसी ब्ल्यू