'शर्जीलसारख्या सापाला अलिगढच्या बिळातूनच काय, पाताळातूनही खेचून आणू'

By महेश गलांडे | Published: February 4, 2021 09:53 AM2021-02-04T09:53:38+5:302021-02-04T09:54:32+5:30

शर्जील उस्मानीने धर्माविरोधात, हिंदूंविरोधात जे वक्तव्य केलंय, त्याची महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्रात येवून कोणीही बाहेरचा माणूस अशाप्रकारे भडकावू भाषण करू शकत नाही, येथील वातावरण बिघडवू शकत नाही.

'Let's pull a snake like Sharjeel out of the abyss of Aligarh, even from the abyss', sanjay raut | 'शर्जीलसारख्या सापाला अलिगढच्या बिळातूनच काय, पाताळातूनही खेचून आणू'

'शर्जीलसारख्या सापाला अलिगढच्या बिळातूनच काय, पाताळातूनही खेचून आणू'

Next
ठळक मुद्देशर्जील उस्मानीने धर्माविरोधात, हिंदूंविरोधात जे वक्तव्य केलंय, त्याची महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्रात येवून कोणीही बाहेरचा माणूस अशाप्रकारे भडकावू भाषण करू शकत नाही, येथील वातावरण बिघडवू शकत नाही.

मुंबई - शर्जील नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावे व त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळय़ांचीच इच्छा आहे, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही. हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, हा फडणवीसांचा प्रश्न योग्यच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर नाहीच नाही, पण दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी ९० दिवसांपासून रस्त्यावर पडले आहेत. ते सर्व शेतकरी हिंदूच आहेत. त्या हिंदू, शीख शेतकऱ्यांना सन्मानाने घरी कधी पाठवणार ते सांगा असा टोला सामना अग्रलेखातू शिवसेनेने भाजपाला लगावला आहे. तर, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही शर्जीला नावाच्या सापाला पाताळातूनही खेचून आणू, असे म्हटलंय. 

शर्जील उस्मानीने धर्माविरोधात, हिंदूंविरोधात जे वक्तव्य केलंय, त्याची महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्रात येवून कोणीही बाहेरचा माणूस अशाप्रकारे भडकावू भाषण करू शकत नाही, येथील वातावरण बिघडवू शकत नाही. शर्जीलला बेडया पडतील तूम्ही निश्चिंत रहा. शर्जीलसारखे साप अलिगढच्या बिळातच काय पाताळात लपून बसेल तरी त्यांना खेचून आणू, असे संजय राऊत यांनी टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय. यांसदर्भातील व्हिडिओ राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.  

सामनातून भाजपाला हिंदू शेतकऱ्यांची आठवण

शर्जिलसारखे कित्येक किडे-मकोडे आले व गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. समस्त हिंदू समाजाला अपमानित करणे हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे. शर्जिलसारखे साप अलिगढच्या बिळातच काय, तर पाताळात लपून बसले तरी त्याला खेचून आणण्याची हिंमत महाराष्ट्र पोलिसांत आहे हे काय फडणवीस यांना माहीत नाही? तेसुद्धा कालपर्यंत राज्यकर्ते होतेच. त्यांच्या मनात तरी महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेविषयी शंका असू नये. शर्जिलला बेड्या पडतीलच. निश्चिंत रहा! ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. पण, रस्त्यावर तीन महिन्यांपासून लढणाऱ्या हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या म्हणजे झाले असा चिमटाही शिवसेनेने काढला आहे.

काय म्हणाला होता शरजील 

‘आज का हिन्दू समाज, हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है। ये जो लोग लिंचिंग करते हैं, कत्ल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है तो क्या करते होंगे अपने साथ? कोई नए तरीके से हात धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे। क्या करते है ये लोग की वापस आकर हमारे बीच खाना खाते है, उठते-बैठते है, फिल्में देखते है। अगले दिन फिर किसीको पकड़ते है फिर कत्ल करते और नॉर्मल लाईफ जीते है। अपने घर में मोहब्बत भी कर रहे है, अपने बाप का पैर भी छू रहे है, मंदिर में पूजा भी कर रहे है, फिर बाहर आकर यही करते है...’, असे वक्तव्य एल्गार परिषदेतील भाषणात शरगीलने केले होते. 

Web Title: 'Let's pull a snake like Sharjeel out of the abyss of Aligarh, even from the abyss', sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.