‘तोडपाणी’ला बसणार आळा

By Admin | Published: October 5, 2016 05:14 AM2016-10-05T05:14:40+5:302016-10-05T05:14:40+5:30

वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून दंडवसुली करताना त्यात पारदर्शकता राहत नाही. काही वेळेला चालकासोबत ‘तोडपाणी’ही केले जाते

Let's sit down | ‘तोडपाणी’ला बसणार आळा

‘तोडपाणी’ला बसणार आळा

googlenewsNext

मुंबई : वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून दंडवसुली करताना त्यात पारदर्शकता राहत नाही. काही वेळेला चालकासोबत ‘तोडपाणी’ही केले जाते. या सर्व गोष्टींना आळा बसून दंडवसुली सोपी व्हावी या उद्देशाने ‘सीसीटीव्ही चलान’ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांकडून घेण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ वाहतूक पोलिसांच्या मुंबईतील मुख्यालयात पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि वाहतूक सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे याद्वारे सातत्याने वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांची नोंद ठेवणे शक्य होईल आणि त्या माहितीच्या आधारे लायसन्स निलंबित करण्यात येईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
मुंबईत नुकतेच ४ हजार ७१७ सीसीटीव्ही बसवण्यात आले. या सीसीटीव्हींद्वारे वाहतूक नियमन करतानाच नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करणे सोपे जाईल. एखाद्या वाहनचालकाने सिग्नल जंप केल्यास, झेब्रा क्रॉसिंग ओलांडून उभे राहिल्यास किंवा बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या चालकाचे वाहन सीसीटीव्हीत कैद होईल. त्याच वेळी नियंत्रण कक्षात असणाऱ्या आॅपरेटरकडून त्या वाहनाची नंबरप्लेटही सीसीटीव्हीत त्वरित कैद केली जाईल आणि चालकाच्या मोबाइलवर दंडात्मक कारवाईचा एसएमएसही करण्यात येईल. त्यासाठी पुरावा म्हणून चालकाला नियम मोडल्याचा फोटोही त्वरित पाठवला जाईल. तारीख, वेळ व ठिकाणांचीही माहिती त्याला त्वरित देण्यात येईल. हा एसएमएस इंग्लिश आणि मराठीतून पाठवण्यात येणार आहे. ही माहिती मिळताच वाहनचालक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे त्या ठिकाणी असणाऱ्या वाहतूक पोलिसाकडे दंड भरेल किंवा वाहतूक पोलिसांकडून उपलब्ध केल्या जाणाऱ्या जवळच्याच कॅश पॉइंटवरही रोख रक्कम भरू शकेल. चालकाला क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे दंड भरावयाचा असल्यास वाहतूक पोलिसाकडे हाताळण्यात येणाऱ्या पीओएस मशिनद्वारे सहज भरू शकेल. या मशिनमध्ये कार्ड स्वाइप करून दंड भरता येईल. यामुळे वाहनचालकाची दंड भरण्याच्या कटकटीतून सुटका होतानाच ‘दंडवसुली’ही पारदर्शक होईल, अशी आशा वाहतूक पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही चलानमुळे सर्व दंडात्मक प्रक्रिया ही कॅशलेस होईल.
चालकांकडून डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे पीओएस मशिन असेल. सध्या ५00 पैकी काही मशिन्स पोलिसांना उपलब्ध केल्या आहेत.
चालकांसाठी जवळच कॅश पॉइंटही उपलब्ध करण्यात येत आहेत. अशी ३५0 ठिकाणे हळूहळू उपलब्ध केली जात आहेत.
चालक वाहतूक पोलिसांच्या वेबसाइटवर जाऊनही दंड आॅनलाइन भरण्याची माहिती घेऊ शकतो.

सातत्याने नियम मोडणाऱ्या चालकाचे लायसन्स निलंबित करणेही या यंत्रणेद्वारे शक्य होईल. चालकाकडून चार किंवा पाच वेळ नियम मोडल्यास त्याची नोंद या प्रणालीद्वारे वाहतूक पोलिसांकडे राहील आणि त्यामुळे लायसन्स निलंबित करण्यासाठी वाहतूक पोलीस आरटीओकडे मागणी करू शकतील.
यापूर्वी एखाद्या चालकाने सातत्याने नियम मोडल्यास त्याची नोंद हाताने करावी लागत असे. त्यामुळे लायसन्स निलंबन करताना अडचणी येत होत्या.
आता ही अडचण राहणार नाही. त्याचबरोबर
वाहतूक नियम उल्लंघनाच्या केसेसही कमी होण्यास मदत मिळेल.

Web Title: Let's sit down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.