'एकपडदा थियटर सुरू करण्यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करुन तोडगा काढावा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 12:23 PM2020-08-25T12:23:18+5:302020-08-25T12:23:52+5:30
'बॉम्बे डे' या वेबसिरिजच्या माध्यमातून नितिन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडिओत लॉकडाऊन घोषणेच्या तब्बल ८० दिवसांनंतर चित्रीकरणाला सुरुवात केली.
मुंबई - देशात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे, तर राज्यात मिशेन बिगेन अगेन सुरू झालंय. सध्या लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आले आहेत. अतिशय कमी लोकांच्या उपस्थित आणि लोकांच्या सुरक्षेची काळजी घेत चित्रीकरण करण्याची देखील मुभा देण्यात आली आहे. मुंबईच्या जवळच असलेल्या कर्जत येथील एन.डी.स्टुडिओत एका वेबसिरिजच्या चित्रीकरणाला दोन महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली होती. चित्रीकरणाला सुरुवात झाली असली, तर अद्यापही थेअटर व सिनेमागृहांना परवानगी नाही. त्यामुळे एकपडदा थिएटर मालकांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली.
'बॉम्बे डे' या वेबसिरिजच्या माध्यमातून नितिन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडिओत लॉकडाऊन घोषणेच्या तब्बल ८० दिवसांनंतर चित्रीकरणाला सुरुवात केली. राज्य सरकारने चित्रीकरणाला परवागनी दिल्यानंतर आता विविध मालिकांचे व चित्रपटांचे शुटींग सुरू झाले आहे. मात्र, सिनेमागृह आणि मल्टीप्लेक्स थेअटर बंदच आहेत. त्यातच, सप्टेंबर महिन्यातही लॉकडाऊन कायम ठेवण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. त्यामुळे, चित्रपट, थिएटरमालक आणि तमाशा कलावंतांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यामध्ये एकपडदा थियटरचालकांच्या विविध मागण्यांचा समावेश आहे. @CMOMaharashtra आपणास नम्र विनंती आहे की,कृपया एकपडदा थिएटरचालकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा. धन्यवाद. @OfficeofUT@AmitV_Deshmukh
— Supriya Sule (@supriya_sule) August 25, 2020
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर एकपडदा थिएटर्स बंद आहेत, यामुळे राज्यातील एकपडदा थियटरचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. ती पुन्हा सुरु करावीत या मागणीचे निवेदन सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष व फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष नितीन दातार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिले आहे. यामध्ये एकपडदा थियटरचालकांच्या विविध मागण्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
एकपडदा थिएटरचालकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी विनंती सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.