नववर्षाची सुरुवात करू श्रीसिद्धिविनायकाच्या दर्शनाने; मुखदर्शनाच्या रांगेची स्वतंत्र व्यवस्था
By सचिन लुंगसे | Published: December 30, 2023 09:41 PM2023-12-30T21:41:54+5:302023-12-30T21:42:07+5:30
अपंग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या रांगेची सुरुवात कोहिनुर हॉटेल समोरील साने गुरुजी गार्डन गेट येथून होईल.
मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात श्रीगणेशाच्या दर्शनाने व्हावी यासाठी भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी दाखल होणार असून, दाखल होणाऱ्या भक्तांना गणपती बाप्पाचे दर्शन नीटनेटके घेता यावे म्हणून मंदिर व्यवस्थापनाने जय्यत तयारी केली आहे. दर्शनाच्या वेळा दर्शनी भागावर लावण्यापासून आशीर्वचन रांग, अपंग, ज्येष्ठ, गरोदर स्त्रियांसह महिलांची आणि मुखदर्शनाच्या रांगेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासकडून देण्यात आली.
अपंग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या रांगेची सुरुवात कोहिनुर हॉटेल समोरील साने गुरुजी गार्डन गेट येथून होईल. तर, मुखदर्शनाच्या रांगेची सुरुवात एस.के. बोले मार्ग, आगर बाझार येथून सुरू होईल. दरम्यान, रात्री ११ वाजता दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात येतील, असे मंदिराकडून सांगण्यात आले.
१ जानेवारी
दर्शन - पहाटे ३:१५ ते पहाटे ५:१५
आरती - पहाटे ५:३० ते पहाटे ६
दर्शन - सकाळी ६ ते दुपारी ११:५५
नैवेद्य - दुपारी १२:५ ते दुपारी १२:३०
दर्शन - दुपारी १२:३० ते सायंकाळी ७
धुपारती - सायंकाळी ७ ते सायंकाळी ७:१०
आरती - सायंकाळी ७:३० ते रात्री ८
दर्शन - रात्री ८ ते रात्री ११
शेजारती - रात्री ११:३०