"दादा, तुम्हीच आमच्या भविष्यासाठीचे दूत, कारण...", चिमुकल्या विद्यार्थिनीचं रोहित पवारांना पत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 05:14 PM2023-04-01T17:14:30+5:302023-04-01T17:16:15+5:30
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रश्नांसाठी कायम आग्रही असतात. आपल्या मतदारसंघात अधिकाधिक निधी नेण्यासाठी प्रयत्नशील असतात.
मुंबई-
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रश्नांसाठी कायम आग्रही असतात. आपल्या मतदारसंघात अधिकाधिक निधी नेण्यासाठी प्रयत्नशील असतात. मतदारसंघातील विविध विषय घेऊन ते सातत्याने मंत्रालयात किंवा संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांच्या कार्यालयातही भेटी-गाठी घेताना दिसून येतात. तसेच, मतदारसंघातही त्यांचा वावर असतो. नुकतंच रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमधील शाळकरी मुलांसाठी तब्बल १० हजार सायकलींचं वाटप केलं. या उपक्रमानंतर एका विद्यार्थिनीनं रोहित पवार यांचे आभार मानणारं पत्र लिहिलं आहे. हे पत्र रोहित यांनी स्वत: त्याच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलं आहे.
PHOTOS: रोहित पवारांच्या मतदारसंघात वाटल्या तब्बल १० हजार सायकली
तृप्ती नावाच्या एका विद्यार्थिनीनं पत्र लिहून रोहित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसंच रोहित पवार हे आमच्या सारख्या नव्या पुढीचे भविष्यासाठीचे दूत असल्याचाही उल्लेख तृप्तीनं केलं आहे. रोहित पवारांनीही तृप्तीच्या पत्रावर प्रतिक्रिया देत त्यांना मिळालेला आनंद व्यक्त केला आहे.
तृप्तीसारख्या हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवणं यांच्यासारखं दुसरं समाधान नाही.. हे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल खरं म्हणणे मीच या मुलांचे आभार मानायला हवेत, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
तृप्तीनं रोहित पवारांना लिहिलेलं पत्र...
तृप्तीसारख्या हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवणं यांच्यासारखं दुसरं समाधान नाही.. हे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल खरं म्हणणे मीच या मुलांचे आभार मानायला हवेत!#सायकलवितरणpic.twitter.com/pMZbhsxp6T
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 1, 2023