ओव्हरहेड वायरवर कोसळला पत्र

By Admin | Published: October 1, 2014 01:08 AM2014-10-01T01:08:22+5:302014-10-01T01:08:22+5:30

करी रोड स्थानकात ओव्हरहेड वायरवर पत्र कोसळल्याने मेन लाइन एक तास विस्कळीत झाली. तर कॉटनग्रीन आणि मरिन लाइन्स स्थानकाजवळ झाडांनीच रेल्वेची वाट अडवली.

Letter overboard in overhead wire | ओव्हरहेड वायरवर कोसळला पत्र

ओव्हरहेड वायरवर कोसळला पत्र

googlenewsNext
>मुंबई : मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकात लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याने मेन लाइनचा बो:या वाजल्याची घटना घडलेली असतानाच संध्याकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसाने मध्य रेल्वेसह हार्बर आणि पश्चिम रेल्वेची वाट अडवली. करी रोड स्थानकात ओव्हरहेड वायरवर पत्र कोसळल्याने मेन लाइन एक तास विस्कळीत झाली. तर कॉटनग्रीन आणि मरिन लाइन्स स्थानकाजवळ झाडांनीच रेल्वेची वाट अडवली. यामुळे कामावरून घरी परतणा:या चाकरमान्यांना फटका बसला. 
संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास  वादळी वा:यासह पडणा:या या पावसाने अवघ्या 1क् मिनिटांत रेल्वेची दैना उडवली. संध्याकाळी 6.4क् च्या सुमारास करी रोड स्थानकात असणा:या तिकीट कार्यालयाचा एक मोठा पत्र उडून थेट ओव्हरहेड वायरवर पडला. यामुळे ओव्हरहेड वायर आणि स्थानकात सीएसटीच्या दिशेने जाणा:या एका लोकलचा पेन्टोग्राफ तुटला आणि स्थानकातील दिवेही बंद झाले. लोकलमधील सर्व प्रवासी स्थानकात उतरल्यानंतर एकच गर्दी स्थानकात झाली. त्यानंतर थोडय़ाच वेळात ओव्हरहेड वायर तुटल्याची उद्घोषणा होत सीएसटीकडे जाणा:या धिम्या लोकल जलद मार्गावर वळवल्याचे सांगण्यात आले. मात्र या घटनेमुळे परेल ते भायखळादरम्यान अप धिम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळवल्याने लोकल 15 मिनिटे उशिराने धावू लागल्या आणि त्याचा फटका कामावरून घरी परतणा:या चाकरमान्यांना बसला. ओव्हरहेड वायर व पेन्टोग्राफची दुरुस्ती एक तासानंतर करण्यात आली.
तर हार्बरच्या कॉटनग्रीन स्थानकाजवळ सायंकाळी 7.1क् च्या सुमारास डाऊन मार्गावर एक झाड पडले. त्यामुळे हार्बर मार्ग सीएसटी ते कुर्लादरम्यान मेन लाइनवरून सुरू ठेवण्यात आली. या मार्गावरील सेवा पूर्ववत करण्याचे काम रात्री उशिरार्पयत सुरू होते. (प्रतिनिधी)
 
पश्चिम रेल्वेलाही फटका 
मरिन लाइन्स ते चर्चगेट स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर रात्री 7.25 च्या सुमारास एक झाड पूर्णपणो वाकले आणि त्याच्या फांद्या ओव्हरहेड वायरला लागू लागल्या. त्यामुळे लोकल सेवेला अडथळा येत असल्याने या मार्गावरील वाहतूक अप धिम्या मार्गावर वळवण्यात आली. साधारण 2क् मिनिटांनंतर ही सेवा पूर्ववत करण्यात आली. 
 
मुंबईत झालेल्या वादळी वा:याच्या पावसामुळे 4क् ठिकाणांहून झाडे आणि झाडांच्या फांद्या पडल्याच्या तक्रारी महापालिका नियंत्रण कक्षाकडे दाखल झाल्या. शिवाय के.ई.एम. रुग्णालय परिसरातील शवागाराच्या बाजूच्या बैठय़ा चाळीवर झाड पडले असून, येथील लोकांच्या तात्पुरत्या निवा:याची व्यवस्था केली आहे. आणि वा:यासह पावसाचा वेग जास्त असल्याने टाटा पॉवरच्या वीज वाहिनीला हानी पोहोचली. परिणामी वांद्रे, सांताक्रूझ आणि गोरेगाव परिसरातील बत्ती गुल झाली होती. तर दक्षिण मुंबईतल्या फोर्ट परिसरातील एका टॅक्सीवर झाड कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Web Title: Letter overboard in overhead wire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.