राम मंदिरप्रश्नी पंतप्रधानांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 12:45 AM2018-12-13T00:45:43+5:302018-12-13T00:46:11+5:30
राम मंदिर व बाबरी मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतानाही सत्ताधारी पक्षातील मंत्री व नेते यांच्याकडून या प्रकरणावर वारंवार वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत.
मुंबई : राम मंदिर व बाबरी मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतानाही सत्ताधारी पक्षातील मंत्री व नेते यांच्याकडून या प्रकरणावर वारंवार वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. ती तत्काळ थांबली नाहीत, तर सत्ताधारी पक्ष व पंतप्रधानांविरोधात अवमान याचिका दाखल करावी लागेल, असे पत्र भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पंतप्रधानांना पाठवले आहे.
पाटील म्हणाले की, या वक्तव्यांमधून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुळात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना अशा प्रकारे कायद्याला सोडून वक्तव्य करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी तत्काळ पक्षातील नेते व मंत्र्यांना या प्रकरणावर कोणत्याही प्रकारचे वक्तव्य न करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा न्यायालयात अवमानप्रकरणी याचिका दाखल करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.