कोविडमुळे दगावलेल्या रुग्णांचे सामान अन् ज्वेलरी नातेवाईकांना मिळेना, मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 05:43 PM2021-06-05T17:43:40+5:302021-06-05T17:44:00+5:30

माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची विनंती

Letters to the Chief Minister, relatives of the victims who lost their lives due to Kovid did not get the jewelery | कोविडमुळे दगावलेल्या रुग्णांचे सामान अन् ज्वेलरी नातेवाईकांना मिळेना, मुख्यमंत्र्यांना पत्र

कोविडमुळे दगावलेल्या रुग्णांचे सामान अन् ज्वेलरी नातेवाईकांना मिळेना, मुख्यमंत्र्यांना पत्र

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली असून पुढच्या आठवड्यात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, पोलीस अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन राज्यासाठी पॉलिसी ठरवण्यात येईल, असे आश्वासन मंत्री सुभाष देसाई यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई - हॉस्पिटलमध्ये कोविड पेशंट मृत पावल्यानंतर त्याच्या जवळ असलेले पाकीट, डेबिट कार्ड्स, ज्वेलरी या महत्वाच्या वस्तू त्याच्या नातेवाईकांना मिळालेल्या नाहीत. यासंदर्भात अनेक तक्रारी राज्यभरातून आहेत. माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे गोरेगाव पूर्व नेस्को कोविड सेंटर व अन्य ठिकाणावरुन अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या वस्तू त्यांच्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना विनंती केल्याची माहिती डॉ. दीपक सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली असून पुढच्या आठवड्यात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, पोलीस अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन राज्यासाठी पॉलिसी ठरवण्यात येईल, असे आश्वासन मंत्री सुभाष देसाई यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. सांताक्रूझ येथील एक कोविड रुग्ण नेस्को कोविड सेंटरमध्ये मृत पाऊन चार महिने झाले, मात्र अजूनही त्याच्या वस्तू त्याच्या नातेवाईकांना मिळल्या नाहीत. आपल्या समक्ष सदर मृताच्या नातेवाईकाने नेस्को कोविड सेंटरच्या प्रशासनाकडे नुकतीच कैफियत मांडली होती, असेही सावंत यांनी सांगितले.

कोरोना काळात मृत रुग्णाचे शव मिळण्यासाठी सात ते आठ तासांचा कालावधी लागायचा, तोही कमी होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी लोकमतकडे व्यक्त केले. कोविड रुग्णाची एकूण परिस्थिती काय आहे याची चिंता घरातल्या व्यक्तींना असते. त्यामुळे सदर व्यवस्था जरी उपलब्ध असली तरी ती कार्यक्षम नाही. त्यामुळे, रुग्णाचे नातेवाईक चिंतेत असतात. राज्यात ही परिस्थिती सर्वत्रच आहे. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले.
 

Web Title: Letters to the Chief Minister, relatives of the victims who lost their lives due to Kovid did not get the jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.