लेझीम, ढोल-ताशांमध्ये भांडूपच्या बाप्पाचा थाट
By Admin | Published: August 17, 2016 03:32 AM2016-08-17T03:32:05+5:302016-08-17T03:32:05+5:30
डिजे च्या काळातही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याला महत्त्व देणाऱ्या भांडुप पश्चिम येथील जनता मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या
लीनल गावडे , मुंबई
डिजे च्या काळातही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याला महत्त्व देणाऱ्या भांडुप पश्चिम येथील जनता मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या ३९ वर्षांपासून मंडळाचे वेगळेपण टिकून ठेवले आहे. गणेशोत्सवातून सामाजिकतेचा संदेश देणाऱ्या या मंडळाने पारंपरिक सणांचा वारसा जपला आहे.
लोकमान्य टिळकांचा आदर्श घेऊन भांडुप पश्चिम येथील जनता मार्केट परीसरात अगदी चार ते पाच कुटुंबांच्या प्रयत्नाने गणेशोत्सवाला सुरुवात झाली. ‘पारंपरिक’ता टिकविणे हे या मंडळाचे उद्दिष्ट असून दरवर्षी कमीत कमी खर्च करत हे मंडळ गणेशोत्सवातील प्रत्येक दिवस मोठ्या उत्साहात साजरे करते.येथील चलचित्र पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करतात. कमीतकमी सजावटीत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या चलचित्रांमधून दिलेला असतो.
आतापर्यंत ‘मुली वाचवा’, ‘व्यसनमुक्त तरुणाइर्’, ‘भांडुपकरांच्या समस्या’, ‘स्त्री सबलीकरण’, ‘मुंबईकरांच्या समस्या’, ‘स्वच्छता’ अशा अनेक सामाजिक विषयांची चलचित्रे अत्यंत समर्पकपणे
मंडळाने मांडली आहेत.
विशेष म्हणजे चलचित्रांसाठी नेहमीच ताजे विषय निवडले जातात. आणि लहान मुलांना समजू
शकतील त्यांना पटू शकतील अशा पद्धतीने त्याचे सादरीकरण करण्यात येते. शिवाय अनेक पौराणिक कथांचेही चलचित्ररुपाने
सादरीकरण केल्याचे उपाध्यक्ष दीपक नागपुरे यांनी सांगितले. उत्सवाचा आरंभ
१९७७ साली पहिल्यांच्या चाळीतील मैदानात बाप्पाचे आगमन झाले. केवळ लोकांनी एकत्र यावे या उद्देशाने अगदी साध्या पद्धतीने या सणाची सुरुवात झाली.
वेगवेगळ्या ठिकाणाहून कामासाठी भांडुप जनता मार्केट येथे वसलेले रहिवासी बाप्पाच्या निमित्ताने एकत्र आले. महोत्सवाचे बाजारीकरण होणार नाही याची काळजी मंडळातर्फे घेण्यात येते.‘इको फ्रेंडली’
पर्यावरणाचे महत्त्व जपत मंडळ शाडूची गणेश मूर्ती घडवून घेते. शिवाय बाप्पाची मूर्ती ही साडेतीन फुटांपेक्षा मोठी नसते. विशेष म्हणजे इको फ्रेंडली सजावट करण्यात येते. मंडळातील र्सच सजावटीस हातभार लावते.