मुंबई : मुलुंड पूर्वेकडील गिअर अप या मोटरड्रायव्हींग स्कूलचा परवाना प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) रद्द केला आहे. या स्कूलमधील प्रकाश रोकडे (47) या प्रशिक्षकाने चालत्या कारमध्ये 19वर्षीय प्रशिक्षणार्थी तरुणीचा विनयभंग केला होता.
गेल्या दीड वर्षापासून मुलुंड पूर्वेकडील 9क् फूट रोडवर गिअर अप मोटर ट्रेनिंग स्कूल सुरू होते. आरटीओचे नियम भंग करणो आणि प्रशिक्षकाने केलेला गंभीर गुन्हा यामुळे स्कूलचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामदास मोरे यांनी दिली. 19 वर्षीय तरूणीवर चालत्या कारमध्ये रोकडेने केलेला हल्ला, विनयभंग आणि बचावासाठी तरूणीने कारमधून घेतलेली उडी या संपूर्ण नाटय़ाचे वार्ताकन सर्वात आधी लोकमतने केले. गीअर अप स्कूलने गुन्हा घडला त्याच्या चारच दिवसांपुर्वी रोकडेची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केले होते. आधीचा प्रशिक्षक सोडून गेल्याने रोकडेला कामावर ठेवल्याचे गीअर अप स्कूलने नवघर पोलिसांना सांगितले.
मोरे यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार या गुन्हय़ातील आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र जामीनाची रक्कम
न भरल्याने तूर्तास तो कारागृहात, न्यायालयीन कोठडीत
आहे. (प्रतिनिधी)