कृषी अधिकारी, आर.टी.ओमार्फत शेतक-यांना आंबा विक्रीसाठी परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 02:24 PM2020-04-03T14:24:35+5:302020-04-03T14:25:46+5:30

कृषी अधिकारी, आर.टी.ओमार्फत आंबा विक्रीसाठी परवाना देण्याचे मंजुर झाले आहे.

License for sale of mangoes to farmers through Agriculture Officer, RTO | कृषी अधिकारी, आर.टी.ओमार्फत शेतक-यांना आंबा विक्रीसाठी परवाना

कृषी अधिकारी, आर.टी.ओमार्फत शेतक-यांना आंबा विक्रीसाठी परवाना

Next

मुंबई : कोकणातील आंबा उप्तादक शेतक-यांना राज्यातील मुंबई, पुण्यासह अन्य शहरांसाठी कृषी अधिकारी, आर.टी.ओमार्फत आंबा विक्रीसाठी परवाना देण्याचे मंजुर झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र  राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.

कोरोनामुळे देशभरात लॉक डाऊन असतानाच चंद्रकांत मोकल यांनी सांगितले की, कोकणात २० ते २५ टक्के हापूस आंबा तयार झाला आहे. आंबा हे नाशिवंत फळ आहे. मोठया मेहनतीने उत्पादीत केलेला हा माल राज्यात, देशात व देशाबाहेर विक्रीस जाणे व सोशल डिस्टन्सचे भान ठेवून मंडई, ग्राहक वर्ग कसा उपलब्ध होईल? यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. या अनुषगांने कोकणातील आंबा उप्तादक शेतक-यांना राज्यातील मुंबई, पुण्यासह अन्य शहरांसाठी कृषी अधिकारी, आर.टी.ओमार्फत आंबा विक्रीसाठी परवाना देण्याचे मंजुर झाले आहे. यापुढेही जाऊन शासनाच्या संकेतस्थळावर  पास मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. याबरोबर  राज्याबाहेर  आणि परदेशी खासकरून मिडल ईस्टमध्ये आंबा निर्यातीसाठी कृषी पणन मंडळ प्रयत्नशील आहे.

मात्र या विक्री व्यवस्थेत अनेक अडथळे येत आहेत. शेतक-यांच्या अडचणीच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई, पुणे येथील असहकार्य, टेम्पो व अन्य वाहतूक साधनांचा अभाव, वाढीव भाडे हे विक्रीतील मोठे अडथळे आहेत. देशाबाहेर कार्गो ट्रान्सपोर्ट सुरु असली तरी कन्टेनर फ्रेट स्टेशन्स बंद असल्याने आवश्यक मनुष्यबळाभावी निर्यात कशी शक्य होईल? म्हणून राज्य व केंद्र शासनाने या विषयात लक्ष घालावे, अशी मागणी संघाने केली आहे.

Web Title: License for sale of mangoes to farmers through Agriculture Officer, RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.