Join us

मुख्यमंत्र्यांसह आयुक्तांच्या नावाने डान्सबारचे परवाने; अज्ञात व्यक्तिंविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 3:11 AM

लेडिज बार अँड रेस्टॉरंटसाठी ०२, वर्षा, नेपीअन्सी रोड, मलबार हिल, तर हुक्का पार्लरसाठी पालिका मुख्यालयातील कार्यालय, दुसरा मजला, महापालिका मार्ग, या पत्त्यांची नोंद प्रमाणपत्रावर करण्यात आली आहे.

मुंबई : ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’अंतर्गत महापालिकेचा आॅनलाइन प्रमाणपत्र प्रक्रियेतील गोंधळ समोर आला आहे. पडताळणीविना आॅनलाइन प्रमाणपत्रे दिल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने लेडिज बार अँड रेस्टॉरंट व मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्या नावे हुक्का पार्लरचे नोंदणी प्रमाणपत्र दुकाने आणि आस्थापना विभागाने जारी केले आहे. महापालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, मुख्यमंत्री व आयुक्त यांच्या नावाचा व पदनामाचा गैरवापर करणे ही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. शिवाय याबाबत महापालिकेने अनुक्रमे माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशन व गावदेवी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तिंविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्याकरिता तक्रार अर्ज देण्यात आला आहे.लेडिज बार अँड रेस्टॉरंटसाठी ०२, वर्षा, नेपीअन्सी रोड, मलबार हिल, तर हुक्का पार्लरसाठी पालिका मुख्यालयातील कार्यालय, दुसरा मजला, महापालिका मार्ग, या पत्त्यांची नोंद प्रमाणपत्रावर करण्यात आली आहे. दोन्ही नोंदणी प्रमाणपत्रावर अनुक्रमे १० व १५ कामगारांची नोंद करण्यात आली आहे. दोघांनाही २४ आॅगस्ट, २०१८ ते २३ आॅगस्ट, २०१९ या कालावधीसाठी ही नोंदणी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. ही प्रमाणपत्रे पालिकेच्या डी विभाग कार्यालयातून देण्यात आली आहेत. दरम्यान, आॅनलाइन अर्ज सुविधा ही नागरिकांच्या सुलभतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि, या पद्धतीने काहीजण जर दुरुपयोग करत असतील, तर त्यांच्या विरोधात भविष्यातदेखील अशा प्रकारचे गुन्हे पालिकेच्या वतीने दाखल करण्यात येतील, असे महापालिकेने म्हटले आहे.स्वयंघोषणापत्र देणे बंधनकारकनागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेने सोईसुविधांविषयीची कार्यवाही गेल्या काही वर्षांमध्ये आॅनलाइन देण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांना यामुळे घरबसल्या करभरणा करणे, आॅनलाइन प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणे इत्यादी बाबींची कार्यवाही करणे सुलभ झाले आहे. सुविधेचा लाभ घेताना संबंधित अर्जदारास त्याच्या अर्जासोबत स्वयंघोषणापत्र देणे बंधनकारक आहे. स्वयंघोषणापत्रातील या मजकुरास स्वीकृती देणे अर्जदारास बंधनकारक आहे. यानुसार, एखाद्या व्यक्तीने खोडसाळपणे व हेतुत: काही चुकीची माहिती दिल्यास, त्यासाठी सदर व्यक्तीच पूर्णपणे जबाबदार असते

टॅग्स :मुंबई महानगरपालिका