Join us

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हायकोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 5:55 AM

बेकायदा हालचाली (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) राज्य सरकारने लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्यावर कारवाई करण्यास दिलेली परवानगी वैध असल्याचा निकाल गेल्या शनिवारी विशेष न्यायालयाने दिला.

मुंबई : बेकायदा हालचाली (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) राज्य सरकारने लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्यावर कारवाई करण्यास दिलेली परवानगी वैध असल्याचा निकाल गेल्या शनिवारी विशेष न्यायालयाने दिला. या निर्णयाला कर्नल पुरोहितने मंगळवारी उच्च न्यायालयात आव्हान दिले.लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, समीर कुलकर्णी, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी यांनी यूएपीएच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.मात्र, गेल्या शनिवारी विशेष एनआयए न्यायालयाने या सर्वांचे अर्जफेटाळत राज्य सरकारने यूएपीएअंतर्गत या सर्वांवर कारवाई करण्यास दिलेली परवानगी योग्य असल्याचे म्हटले. दरम्यान, विशेष न्यायालयाने आरोपींवर २६ आॅक्टोबर रोजी आरोप निश्चित करू, असेही स्पष्ट केले.विशेष न्यायालयाचा आदेश अयोग्य व बेकायदा आहे, असे पुरोहितने याचिकेत म्हटले आहे. त्याच्या या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.