मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल पुरोहित न्यायालयात हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:51 AM2017-08-25T00:51:47+5:302017-08-25T00:52:45+5:30

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर ते पहिल्यांदा विशेष न्यायालयात हजर राहिले.

 Lieutenant Colonel Purohit, accused in the Malegaon blast case, appeared before the court | मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल पुरोहित न्यायालयात हजर

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल पुरोहित न्यायालयात हजर

Next

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर ते पहिल्यांदा विशेष न्यायालयात हजर राहिले. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले तरी त्यांच्या पत्नीने आम्ही नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करू, असे सांगितले.
तळोजा कारागृहातून सुटका होताच पुरोहित सगळ्यात आधी लष्कराच्या सेवेत हजर राहिले. त्यांनी १५ दिवसांची सुटी मागितली आणि लष्कराने ती मान्यही केली.
मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपींवर आरोप निश्चित करण्यासाठी विशेष सरकारी वकिलांनी युक्तिवादास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर पुरोहित यांनी आरोपमुक्ततेचा अर्जही न्यायालयात केला आहे. त्यामुळे पुरोहित गुरुवारी विशेष एनआयए न्यायालयात हजर होते.
पुरोहित यांच्याबरोबरच दयानंद पांडे व समीर कुलकर्णी यांनीही आरोपमुक्ततेचा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सध्या त्यांच्या अर्जावर सुनावणी सुरू आहे. या सर्वांनी त्यांच्याविरुद्ध तपासयंत्रणेकडे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचा दावा केला आहे.

Web Title:  Lieutenant Colonel Purohit, accused in the Malegaon blast case, appeared before the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.