Join us

झूममय झाले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 4:06 AM

झूममय झाले जीवनसध्याची शाळा आणि काही प्रमाणात ऑफिस म्हणजे लॅपटॉप, आयपॅड किंवा स्मार्टफोनसमोर ऑनलाइन पद्धतीने होत असलेले काम. ...

झूममय झाले जीवन

सध्याची शाळा आणि काही प्रमाणात ऑफिस म्हणजे लॅपटॉप, आयपॅड किंवा स्मार्टफोनसमोर ऑनलाइन पद्धतीने होत असलेले काम. दहावी आणि बारावीवगळता सगळे वर्ग सध्या ऑनलाइन सुरू आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या विद्या परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात राज्यात शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या ६० टक्के पालकांकडेच इंटरनेटसह स्मार्टफोन असल्याचे समोर आले आहे. स्मार्टफोन, इंटरनेट, रेडिओ, टीव्ही यांसारख्या सुविधा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांची संख्या १७ टक्के आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी झूम या ॲप्लिकेशनचा सगळ्यात जास्त वापर होत असून, त्या खालोखाल गुगल मीट आणि व्हॉट्सअपचा वापर होत असल्याचे एका खासगी सर्वेक्षणातून समोर आले आहे. झूमवर एकाच वेळी होणाऱ्या ऑनलाइन तासिकेच्या वर्गात अनेक विद्यार्थ्यांना सामावून घेता येते, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे सोपे होते, यामुळे ऑनलाइन तासिकांसाठी झूमची निवड जास्त केली जाते. झूम खालोखाल विद्यार्थी गुगल मीट वापरत असल्याचे समोर आले आहे. अनेक विद्यार्थी व्हॉट्सॲपद्वारे अभ्यास करत असल्याचे समोर आले आहे.

आकडेवारी

झूम - ५७.७ टक्के

गुगल मीट - २३.७ टक्के

व्हॉट्सॲप - ११.४ टक्के

इतर - ७.३ टक्के

(इतर - जिओ मीट, दूरदर्शन, युट्यूब व्हिडीओ इ.)

हे खासगी सर्वेक्षण आहे.