Join us

पाच अक्षरी वाक्याने बदलले आयुष्य- मंडलिक

By admin | Published: December 28, 2015 3:42 AM

‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या पाच अक्षरी वाक्याने अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणल्याचे वक्तव्य एल अ‍ँड टी कंपनीचे संचालक डी. सी. मंडलिक यांनी व्यक्त केले.

मुंबई : ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या पाच अक्षरी वाक्याने अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणल्याचे वक्तव्य एल अ‍ँड टी कंपनीचे संचालक डी. सी. मंडलिक यांनी व्यक्त केले. घाटकोपर पंतनगर येथे रविवारी पार पडलेल्या ‘जीवनविद्या मिशन हीरक महोत्सव’ सोहळ््यात मंडलिक बोलत होते. तरुणांनी सद्गुरूंच्या संदेशाचे पालन करुन आयुष्य सुखकर केले पाहिजे, असहीे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या पुस्तकाच्या १०१ व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून सद्गुरूनी मानवी आयुष्यात असलेल्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर दिले आहे. त्यामुळे सदगुरूंचे हे पुस्तक जीवनविद्येचे एक दीपस्तंभ ठरले आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.या सोहळ््यास जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद पै, शारदामाई, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, भूजलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर, आमदार मंगल प्रभात लोढा, मनसे नेते शिशिर शिंदे, डॉ. अलका मांडके उपस्थित होते.परमेश्वर कोपत नाहीपरमेश्वर कधीही कोप किंवा कृपा करत नाही, असे सद्गुरूंनी सांगितले आहे. जीवनविद्येने कधीही कर्मकांडाला महत्त्व दिलेले नाही. त्यामुळे सद्गुरूंच्या तत्त्वज्ञानाचे पालन केलेले लोक जगात सुखी असल्याचे मत प्रल्हाद पै यांनी व्यक्त केले.