जीवनवाहिनीच ठरतेय प्रवाशांसाठी जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 02:32 AM2019-06-13T02:32:41+5:302019-06-13T02:32:59+5:30

रेल्वे प्रवासात १ हजार प्रवाशांचा मृत्यू : जानेवारी ते मे या कालावधीत आकडेवारी

Life-imprisonment for life-satisfying passengers | जीवनवाहिनीच ठरतेय प्रवाशांसाठी जीवघेणी

जीवनवाहिनीच ठरतेय प्रवाशांसाठी जीवघेणी

Next

मुंबई : मुंबई उपनगरीय लोकल प्रवासात जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या काळात एकूण १ हजार १०५ प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. लोकल प्रवास अजूनही सुरक्षित होत नसल्याने मुंबईची जीवनवाहिनी जीवघेणी ठरत आहे. धावत्या लोकलमधून पडणे, खांब लागणे अशा घटना घडत असल्याने अपघात घडत आहेत.

जानेवारी ते मे या कालावधीत रेल्वे रूळ ओलांडताना ६०७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. चालत्या लोकलमधून पडून २५९ प्रवासी, चालत्या लोकलमधून खांबाला धडकून २ प्रवासी, फलाट आणि लोकलच्या गॅपमध्ये अडकून ३ प्रवासी, विद्युत तारेच्या झटक्याने १२, नैसर्गिक मृत्यूमध्ये १८६ तर इतर कारणांमुळे २२ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. १४ प्रवाशांनी रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली आहे.

१५ डब्यांच्या लोकलची गरज
१ हजार १०५ जणांचा मृत्यू होणे खूप गंभीर बाब आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील मृत्यू रोखण्यासाठी गर्दी नियंत्रणात आणायला हवी. त्यासाठी
१२ डब्यांच्या सर्व लोकल १५ डब्यांच्या करणे गरजेचे आहे. यामुळे साधारण ३० टक्के गर्दीला विभाजित करणे शक्य होईल. रेल्वे रूळ ओलांडणाच्या ठिकाणी सुरक्षा भिंत उभारणे गरजेचे आहे. यासह सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी सांगितले.

Web Title: Life-imprisonment for life-satisfying passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.