आयुष्य लॉक पेट्रोल दरवाढ अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:06 AM2021-05-16T04:06:31+5:302021-05-16T04:06:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. असे ...

Life lock unlock petrol price hike | आयुष्य लॉक पेट्रोल दरवाढ अनलॉक

आयुष्य लॉक पेट्रोल दरवाढ अनलॉक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. असे असले तरी पेट्रोलची दरवाढ मात्र कमी होत नसल्याचे दिसत आहे. सातत्याने दरवाढ होत असून, पेट्रोलने शंभरीत प्रवेश केला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

मुंबईत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. ते ठप्प असतानाही पेट्रोल दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाही. सध्या शहरात पेट्रोल ९८ रुपये ६६ पैसे प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. त्यातही काही भागांत पेट्रोलच्या किमतीतही काही पैशांची तफावत आढळून येत आहे. याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. कोरोनाच्या काळात अनेकांनी दुचाकीवर व्यवसाय थाटले होते. आता पेट्रोलच शंभरीत पोहोचल्याने व्यवसाय करावा तरी कसा, असा प्रश्न व्यावसायिकांना पडत आहे. २००९ मध्ये ४४ रुपये ५५ पैसे प्रतिलिटर दराने मिळणारे पेट्रोल आता ९८ रुपये ६६ पैशांनी खरेदी करावे लागत आहे.

तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्स जास्त

पेट्रोलवर कोणताही स्थानिक कर लावला जात नाही. मात्र, केंद्र व राज्य शासनाकडून आकारल्या जाणाऱ्या भरमसाट करांमुळे पेट्रोलची मूळ किमतीपेक्षा अधिक पटींनी विक्री होत आहे. एक लिटर पेट्रोलची किंमत ३८ रुपये १० पैसे आहे. त्यात एक्साईज ड्युटी ३२ रुपये ९८ पैसे, राज्य शासनाचा टॅक्स २६ रुपये २६ पैसे, डीलरचे कमिशन ३ रुपये ४१ पैसे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पेट्रोलवरील कर कमी केल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल.

सध्या आम्ही लॉकडाऊनमुळे घराबाहेर जास्त फिरू शकत नाही. मात्र, पूर्वीप्रमाणे व्यवहार सुरू झाले की आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. तेव्हा पेट्रोलही जास्त लागेल आणि सगळेच बजेट कोलमडून पडेल. सरकारने लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत.

विकास सोनवणे

पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त आहेत, त्यामुळे मी दररोज १०० किमी सायकल चालवतो. सायकलचा वापर केल्यास प्रदूषणही कमी होईल. सायकलमुळे व्यायामदेखील होतो आणि पेट्रोलदेखील वाचते. भाववाढ अशीच सुरू राहिली तर सायकल हाच सर्वोत्तम पर्याय ठरेल.

दिवाकर बनसोडे.

Web Title: Life lock unlock petrol price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.