मुंबई : रेल्वेकडे मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून पाहिले जाते. परंतु हीच जीवनवाहिनी मुंबईकरांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत झालेल्या रेल्वे अपघातांतून समोर आले आहे. या कालावधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर तब्बल २ हजार ७३४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाले आहेत.मुंबई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील रेल्वेमार्गावर रोज सुमारे १५ ते २० प्रवाशांचा अपघाती मृत्यूू होतो. यात रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मध्य रेल्वेमार्गावर जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत १ हजार ७८४ प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला. तर, याच कालावधीत पश्चिम रेल्वेमार्गावर ९५० प्रवाशांना नाहक जीवास मुकावे लागले आहे.मध्य व पश्चिम अशा दोन्ही मार्गांवर रेल्वे रूळ ओलांडताना १ हजार ४७६ जणांचा मृत्यू झाला आहे.रूळ ओलांडताना सर्वाधिक मृत्यूमध्य तसेच पश्चिम या दोन्ही मार्गांवर जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत रेल्वे रूळ ओलांडताना १ हजार ४७६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नयेत, यासाठी मुंबईतील १८३ ठिकाणी उंच भिंती उभारण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.अपघात रोखण्यासाठी जगजागृतीपर कार्यक्रम, समाज प्रबोधन, अॅक्शन प्लॅन तयार करा, त्यासाठी विशेष मोहीम राबवा, अशा सूचनाही त्यांनी रेल्वे अधिकाºयांना दिल्या आहेत. कितीही जनजागृती केली तरी घाईत असलेले अनेक जण रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट निवडतात आणि ते त्यांच्यासाठी जीवघेणे ठरत असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी ठरतेय जीवघेणी! मध्य, पश्चिम रेल्वेमार्गावर २ हजार ७३४ प्रवाशांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 6:42 AM