जीव धोक्यात घालून नवख्या धावपट्टीवर उतरविली विमाने, अडकलेल्या नागरिकांसाठी जवानांची कर्तबगारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 06:12 AM2019-08-12T06:12:48+5:302019-08-12T06:13:13+5:30

कोल्हापूर आणि सांगली येथील अभूतपूर्व अशा नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दल, नौदल तटरक्षक दलाच्या जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावून पूरग्रस्तांच्या सहाय्यासाठीचे नवख्या धवापट्टीवर विमाने व हेलीकॉप्टर्स उतरवली आहेत.

 Life-threatening planes, no-frills duty for civilians | जीव धोक्यात घालून नवख्या धावपट्टीवर उतरविली विमाने, अडकलेल्या नागरिकांसाठी जवानांची कर्तबगारी

जीव धोक्यात घालून नवख्या धावपट्टीवर उतरविली विमाने, अडकलेल्या नागरिकांसाठी जवानांची कर्तबगारी

Next

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली येथील अभूतपूर्व अशा नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दल, नौदल तटरक्षक दलाच्या जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावून पूरग्रस्तांच्या सहाय्यासाठीचे नवख्या धवापट्टीवर विमाने व हेलीकॉप्टर्स उतरवली आहेत. गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर विमानतळावर हवाईदल, नौदल, तटरक्षक दलाची विमाने मदत साहित्य घेऊन पोहचत आहेत. बुधवारी ११ वेळा, गुरूवारी १४ वेळा तर शुक्रवारी १६ वेळाविमाने आणि हेलीकॉप्टर्स या विमानतळावर उतरली आहेत.
हवाईदल किंवा नौदलामार्फत लष्करी विमाने उतरवण्याआधी कोणत्याही नव्या हवाईपट्टीची सुरक्षिततेच्या दृष्टीने निरीक्षण केले जाते. मात्र महापुरामुळे कोल्हापूर, सांगलीत असे पूर्वनिरीक्षण अशक्य होते. त्यामुळे कोणत्याही पूर्वनिरीक्षणाशिवायच हवाईदल, नौदल, तटरक्षक दलाच्या वैमानिकांनी धावपट्टीवे विमाने आणि हेलीकॉप्टर उतरवली. पावसामुळे हवामान खराब असतानाही नवख्या हवाईपट्टीवर भारतीय नौदल, हवाईदल आणि तटरक्षक दलांनी अजोड अशी कामगिरी बजावली आहे.
महापुरामुळे कोल्हापूरचा संपर्क केवळ हवाईमार्गेच साधता येऊ शकत होता. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे हवाईदल, नौदल व तटरक्षक दलाच्या सहायाची विनंती केली होती. त्यानुसार जलदगतीने देशभरातील विविध ठिकाणांहून मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्री हवाई मार्गाने कोल्हापूर येथे पोहचविण्यात येत आहे. कोल्हापूर, कराड, सातारा व सांगलीमध्ये मदत कार्य सुरू केले आहे. संरक्षण दलांनी गोवा, हुबळी, मुंबई, पुणे, भटींडा, भुवनेश्वर, विशाखापट्टणम येथून हवाई मार्गाने विविध पथकांसह बोटी व इतर मदत सामग्री या दोन्ही जिल्ह्यांना पाठविली. त्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांची तातडीने सुटका करणे व मदत साहित्य पोहोचविणे शक्य झाले.

१२ पथके ‘ग्रीन कॉरिडॉर’ने सांगलीला
मुंबई येथील कलिना व लायन गेट वरुन सांगलीतील महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षा व सहाय्यासाठी १२ पथके ‘ग्रीन कॉरिडॉर’ करुन अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत सांगलीला पाठवण्यात आले. स्थानिक जिल्हा प्रशासन महाराष्ट्र पोलीस, एनडीआरएफ, महाराष्ट्र सुरक्षा दल सुध्दा नागरिकांच्या मदत आणि सहाय्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे.

Web Title:  Life-threatening planes, no-frills duty for civilians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर