लाइफलाइन पुन्हा धावू लागली, ‘विशेष लोकल’ने मुंबईकरांचा प्रवास संथगतीने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 03:23 AM2017-08-31T03:23:16+5:302017-08-31T03:23:34+5:30
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची लाइफलाइन समजल्या जाणाºया रेल्वेवाहतुकीला ‘ब्रेक’ लागला. बुधवारी बहुतांशी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली.
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची लाइफलाइन समजल्या जाणाºया रेल्वेवाहतुकीला ‘ब्रेक’ लागला. बुधवारी बहुतांशी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली. मात्र रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रशासनाने सर्व लोकल फे-या या ‘विशेष लोकल’ म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला. यामुळे विविध स्थानकावर ०.०० या वेळेचे इंडिकेटर दिसत होते. दुपारी तासाच्या प्रतीक्षेनंतर सुटणाºया लोकलच्या फेºयांमध्ये सायंकाळच्या सत्रात वाढ करण्यात आली. स्थानकावर इंडिकेटर नसल्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष होता. मात्र उद्घोषणेनंतर येणाºया लोकलमुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. संध्याकाळनंतर हळूहळू का होईना, पण परिणामी ‘इंडिकेटर नको पण गाडी येऊ दे’ अशी प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये उमटत होती.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील २९०० उपनगरीय फेºयांमधून ७५ लाखांहून जास्त प्रवासी रोज प्रवास करतात. परिणामी पावसाच्या रौद्र रुपापुढे या लाखो प्रवाशांचा प्रवास थांबला. बुधवारी सायंकाळच्या सत्रात मध्य मार्गावरील अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रेल्वे वाहतूक सुरु झाली.
सुमारे ३५ तासानंतर सीएसएमटी येथून कसारासाठी ६ वाजून २० मिनिटांनी लोकल रवाना करण्यात आली. हार्बर रेल्वेवरील डाऊन मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल, पनवेल ते कुर्ला अशा लोकल चालविण्यात आल्या. कुर्ला ते सीएसएमटी मार्ग सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास सुरु करण्यात आला.
‘टिष्ट्वट’ पाहा... पश्चिम रेल्वे प्रशासनाला उपनगरीय लोकलच्या सद्यस्थिती बाबत विचारण्यात आले. ‘आम्ही जे टिष्ट्वट करु ते पहा’...असे उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिले. यामुळे प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत होती. दरम्यान मध्य आणि हार्बर लोकलकल्लोळामुळे प्रवाशांनी पश्चिम रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दिली.