‘लाइफलाइन’ करणार कर्करोगावर उपचार
By Admin | Published: December 27, 2016 01:58 AM2016-12-27T01:58:49+5:302016-12-27T01:58:49+5:30
लाइफलाइन एक्सप्रेसला नुकतेच दोन डबे जोडण्यात आले. या दोन डब्यांच्या माध्यमातून मुखाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग नियंत्रण, प्रतिबंधाचे कार्य
मुंबई : लाइफलाइन एक्सप्रेसला नुकतेच दोन डबे जोडण्यात आले. या दोन डब्यांच्या माध्यमातून मुखाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग नियंत्रण, प्रतिबंधाचे कार्य करण्यात येईल. या एक्सप्रेसमध्ये मुखाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. या
नव्या डब्यांद्वारे कर्करोगाविषयी जनजागृती करणे व उपचारपद्धती
सर्वदूर पोहोचविणे हे मुख्य उद्देश आहेत.
टाटा मेमोरिअल सेंटरच्या सहयोगाने इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनने कर्करोगाचे उपचारांची सेवा लाइफलाइन एक्सप्रेसमध्ये पुरविली आहे. या माध्यमातून प्राथमिक पातळीवर कर्करोगाचे निदान करुन उपचार करण्याविषयीचे प्रशिक्षण स्थानिक डॉक्टरांना देण्यात आले. तसेच, या एक्सप्रेसमध्ये मुखाच्या तपासणी शिबिराच्या आयोजनात बहुतांश व्यक्तींमध्ये पूर्व कर्करोगाची प्राथमिक लक्षणे दिसून आली. यावेळी, नाशिकचे जिल्हाधिकारी नरेश पाल यांनी लाइफलाइन एक्सप्रेसमध्ये उपस्थिती दर्शविली.
सटाणा येथे पार पडलेल्या लाइफलाइन एक्सप्रेसच्या शिबिरांत ६ हजार रुग्णांनी सहभाग दर्शविला, तर ४५० शस्त्रक्रिया यावेळी पार पडल्या. एक्सप्रेसमध्ये ५२ वर्षीय व्यक्तीवर २४ डिसेंबर रोजी मुखाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे डॉ.पंकज चर्तुवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर त्याच दिवशी दुसऱ्या रुग्णावर कानाजवळील ग्रंथीवर शस्त्रक्रिया करण्यात
आली. (प्रतिनिधी)