लोकलवर दगड मारल्यास जन्मठेप

By admin | Published: May 27, 2017 03:09 AM2017-05-27T03:09:04+5:302017-05-27T03:09:04+5:30

समाजकंटकांविरुद्ध पश्चिम रेल्वेने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकलवर दगडफेक करणे, रेल्वेच्या काचा फोडणे किंवा रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान

Lifelong life | लोकलवर दगड मारल्यास जन्मठेप

लोकलवर दगड मारल्यास जन्मठेप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समाजकंटकांविरुद्ध पश्चिम रेल्वेने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकलवर दगडफेक करणे, रेल्वेच्या काचा फोडणे किंवा रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दोषींना जन्मठेपेची शिक्षा देण्यासाठी फौजदारी कारवाई करण्याची शिफारस करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेच्या वतीने घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम रेल्वेच्या लोकलवर अज्ञात इसमांकडून दगडफेक करण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमासह अन्य मार्गाने तक्रार दाखल केली आहे. याबाबत परेच्या वतीने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जानेवारी ते मे २0१७ दरम्यान रेल्वेवर ३४ वेळा दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी दगडफेकीमुळे प्रवाशांना इजा होते, शिवाय लोकलही खोळंबून राहते.
चालत्या लोकलवरील दगडफेकीमुळेच रेल्वेच्या खिडक्यांना संरक्षित जाळी बसवण्यात आली होती. मात्र रेल्वेकडून दगडफेकीच्या प्रकाराविरोधात जरब बसवण्यासाठी शिक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी परेने रेल्वे नियमांनुसार, चालत्या लोकलवर दगडफेक करून प्रवाशांना गंभीर जखमी करण्याच्या गुन्ह्यातील दोषींवर जन्मठेपेची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

Web Title: Lifelong life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.